जिल्हात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. बाधितांची संख्या आटोक्यात येण्यासाठी सकाळी १ वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना बंद ठेवण्याचा देखील निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे. याच पार्श्वभुमीवर केवळ मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आलेली आहे. मात्र आस्थापनाची वेळ निश्चित करण्यात आल्याने खरेदी करण्यासाठी सकाळी महिला वर्गासह नागरिकांची व कर्मचाऱ्यांची सकाळी १२ वाजता मोठ्या प्रमाणात वर्दळ होते. या कालावधीत पोस्ट कार्यालय ते तालुका पोलीस स्टेशन भागात मोकाट जनावरे रस्त्यावर ठिय्या मांडतात. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यासह महाराणा प्रतापसिह चौक, झाशीची राणी चौक, गाेल चौकी, पाचकंदील, कराचीवाला खुंटसह अन्य मुख्य रस्त्यावर कायम स्वरूपी जणावरे ठाण मांडून बसतात. मात्र मनपाकडून काही वर्षापासून काहीही कारवाई हाेतांना दिसून येत नाही. मोकाट जनावरे अचानक रस्त्यावर आल्याने अनेक वेळा अपघात झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मनपाने तातडीने मनपाच्या जागेवर स्वमालकीचा कोडवाडा तयार करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मनोज घोडके यांनी केली आहे.
महापालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा: मनोज घोडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:26 AM