सर्वधर्मसमभावाचे बाशिंग : हिंदू पद्धतीने निमंत्रण पत्रिका व स्वागत समारंभमुस्लीम युवकाची ‘विवाह’ क्रांती दोंडाईचा : येथील वसीम इब्राहीम शेख या उच्चशिक्षित मुस्लीम तरुणाने कट्टर धार्मिकतेला फाटा देत आपल्या विवाहाचा स्वागत समारंभ हिंदू पद्धतीने केला. गेल्या महिन्यात 4 जानेवारी रोजी दोंडाईचा येथे त्याने हे क्रांतिकारक पाऊल उचलून सर्वधर्मसमभावाचा आदर्श घालून दिला. वसीम इब्राहीम शेख हा एम.एस्सी. बी.एड. असा उच्चशिक्षित असून 1 जानेवारी 2017 रोजी त्याचा विवाह चोपडा येथे नाजीया शेख हिच्याशी झाला. यानंतर त्याने 4 जानेवारी रोजी दोंडाईचा येथील आपल्या राहत्या घरी मित्रमंडळी व हितचिंतकांसाठी स्वागत समारंभाचे आयोजन केले. या समारंभाची पत्रिका त्याने पूर्णपणे हिंदू धर्मीयांच्या पद्धतीने छापून सर्वाना आश्चर्यचकित केले. या स्वागत समारंभावेळी वसीम याने राणीपुरा भागातील गणपती मंदिरात जाऊन ‘श्रीं’च्या चरणी माथा टेकला. घोडय़ावर बसून मिरवणूकही काढली. अनेक हिंदू बांधव या सोहळ्यात उपस्थित होते. वसीम हा केमिस्ट आहे, तर त्याचे वडील इब्राहीम शेख एका सोसायटीत कामाला होते.हिंदू धर्माप्रमाणे साकारली लग्नपत्रिकामी उच्चशिक्षित असून इतिहास वाचला आहे. अन्य धर्मातील देवतांना मी मानतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचाही इतिहास मी वाचला आहे. मुस्लीम बांधवांनाही शिवराय समानतेची वागणूक देत होते. मुस्लिमांसाठी त्यांनी अनेक सुधारणा केल्या. त्यांचे सरदारही मुस्लीम होते. त्यामुळे मी आमंत्रण पत्रिकेत त्यांचा फोटो छापला. शिवमुद्राही छापली आणि जय गणेश, जय भवानी, जय शिवाजी असा जयघोषही छापला. - वसीम इब्राहीम शेख