धुळे : नागपूर येथे दि ९ आॅगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनी आयोजित आदिवासी विकास विभाग राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा २०१९ अंतर्गत साक्री तालुक्यातील इंदवे येथील आश्रम शाळेतीलएव्हरेस्ट कन्या चंद्रकला गावित हिचा सत्कार आणि २५ लाखांचा धनादेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला़ याप्रसंगी व्यासपीठावर आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, राज्यमंत्री परिनय फुके, नाशिक अप्पर आयुक्त गिरीष सरोदे, हितेश विसपुते, अनिल महाजन, तसेच चंद्रकलाची आई कमलबाई, वडील उत्तम गावित, इंदवे ता़ साक्री येथील आश्रमशाळेचे प्राचार्य प्रविण ठाकरे, क्रीडा शिक्षक भुषण सोनवणे व मान्यवर उपस्थित होते. २३ एप्रिल रोजी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट तिने पादाक्रांत केले होते. त्या मोहिमेत सहभागी ११ पैकी ९ आदिवासी विद्यार्थ्यांनी शिखर पार केले होते. त्यांच्यासह न चढू शकलेल्यांचा सुध्दा सत्कार यावेळी नागपूर येथे झाला. तसेच ३ आॅगस्ट रोजी इंदवे ता़ साक्री येथे राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे हस्ते मिशन शौर्य-२ मध्ये सहभागी चंद्रकलाचा नागरी सत्कार करण्यात आला होता. दरम्यान, तिचा सन्मान झाल्याबद्दल इंदवे येथील तिच्या गावात जल्लोष झाला़
‘एवरेस्ट’ पार करणाºया इंदवे येथील आदिवासी कन्येचा नागपुरला सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:43 PM