आॅनलाइन लोकमतधुळे : आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. चाकण येथे जमावाने महामंडळाच्या बससह अनेक वाहनांची तोडफोड करीत नुकसान केले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धुळे विभागाने नाशिकमार्गे जाणारी पुणे बससेवा तूर्त बंद ठेवली आहे. बससेवा बंद असल्याने विभागाला जवळपास ८ ते १० लाखांचा फटका बसला आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या दहा-बारा दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले.पुणे जिल्ह्यातील चाकण येथे झालेल्या आंदोलनादरम्यान जमावाने अनेक वाहनांची तोडफोड केली. धुळे विभागातील साक्री, नंदुरबार व नवापूर आगाराच्या पुणे बसेस या नाशिकमार्गे जात असतात. यात साक्रीच्या ४, नंदुरबारच्या ३ व नवापूर आगाराच्या ७ अशा एकूण दरोरोज १४ फेºया पुण्याच्या होत असतात. या माध्यमातून शेकडो प्रवाशी बसद्वारे प्रवास करतात.चाकण येथे घडलेल्या हिंसक प्रकारानंतर प्रवाशांची सुरक्षितता, त्याचबरोबर एस.टी. बसेसचे नुकसान होऊ नये म्हणून नाशिकमार्गे जाणाºया पुणे बसगाड्या या ३० जुलैपासून तूर्त बंद करण्यात आलेल्या आहेत. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर नाशिकमार्गे बंद करण्यात आलेली पुणे बससेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान परजिल्ह्यात झालेल्या हिंसक आंदोलनात धुळे विभागाच्या एकाही बसचे नुकसान झालेले नाही. आढावा घेऊन बस सोडल्या जातात पुणे, नाशिक मार्गावर कुठे आंदोलन, रास्तारोको असल्यास, तसा आढावा घेऊनच बससेवा सुरू ठेवण्यात येत आहे.शिर्डीमार्गे सुरळीत...धुळे जिल्ह्यातील सर्व बसगाड्या या शिर्डीमार्गे पुण्याला जात असतात. त्यांची वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले.
नाशिकमार्गे पुणे बससेवेला तूर्त लागला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 11:39 AM
आंदोलनाचा परिणाम : विभागाला १० लाखांचा फटका
ठळक मुद्देधुळे विभागातून १४ बसेस नाशिकमार्गे पुण्याला जातात३० जुलैपासून या मार्गावरील बससेवा बंदधुळे विभागाला १० लाखांचा फटका