दोंडाईचा : दर्जेदार व गुणवत्तायुक्त इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यात १७ वर्षांपासून सदैव अग्रेसर असणाऱ्या हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, हस्तीच्या पूर्व प्राथमिक शाळेला अर्ली चाईल्ड हूड असोसिएशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील २ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.१२ व १३ फेब्रुवारी दरम्यान अर्ली चाईल्ड हूड असोसिएशनची अर्ली एज्यु एशिया वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद सिटी पँलेस, जयपूर- राजस्थान येथे ‘आपली मुले-आपले भविष्य’ या विषयावर झाली. आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन जयपूर राजघराण्याच्या राजकुमारी व आमदार दियाकुमारी यांनी केले. परिषदेचे आयोजन ईसीएच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.स्वाती पोपट वत्स, एज्युकेटिव्ह डायरेक्टर डॉ.रीता सोनावात, कोषाध्यक्षा डॉ.कामिनी रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.पूर्व प्राथमिक शिक्षणात गुणवत्तायुक्त शिक्षणाचे महत्त्व, आपल्या संस्कृतीची व संस्कारांची शिक्षणात गुंफण करणे, तसेच याकरिता इटलीचे डॉ. डेनियला, डॉ.स्टीफन कोबेलो, इंग्लडचे डॉ.क्लेअर वाँर्डन, हैद्राबादच्या सोनल अँड्रयुज, डॉ.रॉबर्ट टिझर, मुंबईचे समीर दलवाई, आशा वर्मा, स्नेहा तापडिया पुणे असे विविध ठिकाणांहून तज्ज्ञ वक्ते आले होते. परिषदेमध्ये हॉल आँफ फेम अँवार्ड शृंखले अंतर्गत हस्ती स्कूलला राष्ट्रीय पातळीवरील अतिशय मानाचे ‘ग्रीन स्कूल अँवार्ड’ जे संपूर्ण भारतातून फक्त चार शाळांना दिले गेले व ‘एशिया टॉप-फिफ्टी नॉन फ्रँचायझी स्कूल अॅवॉर्ड’ अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सदरचे पुरस्कार डॉ. डेनियला, डॉ. अर्नेस्टो, डॉ.रिता सोनावत यांचे हस्ते हस्ती स्कूलचे चेअरमन कैलास जैन, सौ.शितल जैन, सकीना भारमल, स्मिता साठे, पूनम पाटिल व प्रियंका जैन यांनी स्विकारले. हस्ती बँक उपाध्यक्ष पहलाज माखिजा, जेष्ठ संचालक मदनलाल जैन, शालेय समिती जेष्ठ संचालक यशवंत स्वर्गे, डॉ विजय नामजोशी यांनी कौतुक केले.स्व. शांतीलालजी जैन व स्व. कांतीलालजी जैन यांनी एक उद्दात हेतूने सुरु शाळा सुरु केल्या आहेत़
हस्ती शाळेला राष्ट्रीय पातळीवरील दोन पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:17 PM