लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शहरातील क्रांती नगर रोडवर उभ्या असलेल्या एका संशयित तरूणास देशी बनावटीचे एक पिस्तूल कब्ज्यात बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तर विक्री करणारा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला़बुधवारी संध्याकाळच्या सुमारास येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार क्रांतीनगरातील न्यू भारत सर्व्हीस सेंटरसमोर एकाकडे देशी बनावटीचे पिस्तूल आहे़ त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मुकेश गुजर, रफीक मुल्ला, विश्वास पाटील, समीर पाटील, बागले, गवळी, खालाणेकर, अमृतकर यांचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी संशयित महेंद्र उर्फ आप्पा भगवानसिंग राजपूत (३०) रा. क्रांतीनगर शिरपूर याची अंगझडती घेतली. त्यात त्याच्या पॅन्टच्या खिशात एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल मिळून आले़ सदर पिस्तूल कोठून आणले व कुणाला देत होता, याबाबत विचारणा केली असता त्याने आरंभी उडवाउडवीची उत्तरे दिलीत़ मात्र काही वेळानंतर त्याने सदरचे पिस्तूल १० हजार रूपये किमतीचे असून अर्जून राजू बेंडवाल रा़शिरपूर याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले़ त्यामुळे पिस्तूल जप्त करून राजपूत यास अटक करण्यात आली.
देशी बनावटीचे पिस्तूल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 6:03 PM
शिरपूर शहरातील घटना : घेणाºयास अटक, विक्रेता मात्र फरार
ठळक मुद्दे तर बेंडवाल मात्र फरार झाला. त्याचा शोध सुरू आहे़याबाबत राजपूत व बेंडवाल या दोघांविरूद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ करीत आहे़यापूर्वी, सांगवी पोलिसांनी ५ आॅगस्ट रोजी सांगवी शिवारातील आंबा फाट्याजवळ भरत दुलसिंग भील रा़पनाखेड यास गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी जेरबंद केले होते़ त्याच्याकडून ५ हजार रूपये किंमतीचा कट्टा ताब्यात घेण्यात आला होता़