धुळे शहरातील मालेगाव रोडवरील गोशाळेच्या मैदानावर आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी आठवडयापासून सुरु होती. गेल्या दोन ते तीन दिवसापासून दिल्लीचे कमांडो पथक आणि अन्य जिल्ह्यातून आलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे शहराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. शनिवारी तर सकाळपासून शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होात.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्ताने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिगरीक्षक छोरींग दोर्जे हे शुक्रवारी सकाळपासूनच धुळ्यात तळ ठोकून होते. ते स्वत: शहरातील पोलीस बंदोबस्ताची सुत्रे हातात घेतली होती. शनिवारी सकाळपासूनच ते सभा स्थळी उपस्थित होते. त्यांच्या सोबत जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे हे सुद्धा लक्ष ठेऊन होते.प्रसाधानगृहाची सोयसभास्थळाच्या कडेला अनेक फिरत्या प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे सभेला उपस्थित नागरिक विशेषत: महिला व बंदोबस्तास असलेल्या कर्मचाºयांची गैरसोय टळली. सभेला आलेल्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केलेली होती. त्यात पाण्याचे टॅँकर, गार पाण्याचे जार ठेवण्यात आले होते. दुपारी प्रचंड उकाडा जाणवला. त्यामुळे पाणी पिण्याकरीता झुंबड उडत होती. मात्र सर्वांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत होते.पार्किंगसाठी केलेली जागा अपुरी ठरल्याचे दिसले. त्यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांच्या घरांसमोर, अंगणात दुचाकी, चारचाकी वाहने उभी (पार्क) करण्यात आली होती.मेटल डिटेक्टरमधून प्रवेशसभास्थळी प्रवेशाच्या ठिकाणी अनेक मेटल डिटेक्टर लावण्यात आले होते. प्रत्येक नागरिकास त्यातून जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दृश्य पहावयास मिळाले. संशय आल्यास अंगझडती घेऊन आत सभेसाठी सोडण्यात येत होते. शेवटच्या टोकापासून तसेच बाजूने व्यासपीठ लांब असल्याने त्याच्या डाव्या बाजूने चार ते पाच मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे बसल्या जागेवरून नागरिकांना त्यांची भाषणे ऐकण्यास व पहावयास मिळाली. खबरदारी म्हणून महापालिकेचा अग्निशमन विभागाचा एक बंबही सभास्थळी उभा करण्यात आला होता. सभास्थळी मालेगावरोड, अग्रवाल नगर या बाजूपेक्षा १०० फुटी रस्त्याकडून येणाºया नागरिकांचा ओघ जास्त होता.सभास्थळी काळ्या कपड्यांना मनाई करण्यात आली होती. त्याचा फटका अनेकांना बसला. त्यांना प्रवेशच देण्यात आला नाही. पण जे तत्पूर्वीच सभास्थळी दाखल झाले होते, त्यांनाही बाहेर काढण्यात आले. त्याचा फटका प्रसिद्धी माध्यमांनाही बसला. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पोलीस दलातर्फे व्यवस्था करण्यात आली आहे़असा होता सभेत पोलीस बंदोबस्त४केंद्रीय राखीव दलाच्या जवांनावर झालेल्या भ्याड हल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धुळ्यातील पहिलीचं सभा असल्याने कार्यक्रमस्थळी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता़ यावेळी परिसरातील ३४ इमारतीवरून पोलीसांचा वॉच सलग चार तास तैनात होता़४सभेच्या ठिकाणी सुरक्षेसाठी अत्याधुनिक स्वरूपाच्या २०० वायरलेस सेटची व्यवस्था करण्यात आली होती़ हिरव्या रंगाच्या लष्करी छावणीच्या स्वरूपात या नियंत्रण कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती़४गेल्या दोन दिवसापासुन पोलीस कर्मचाºयांना २४ तास बंदोबस्त लावण्यात आला होता़ शहरातील सभास्थळाकडे जाणाºया रस्त्यावर ठिकठिकाणी तपासणी केली जात होती.४ सभेच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन दिवसापासुन धुळे, नासिक, अहमदनगर, मालेगाव, जळगाव, नंदूरबार, औरगाबाद जिल्ह्यातील बॉम्ब शोधक पथकाचा वॉच घटनास्थळी होता़४कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाºया पाहूण्यासाठी व्हीआयपी पास व इतर अधिकारी व कर्मचाºया देखील ओळखपत्र सक्कीचे करण्यात आले होत़े दरम्यान या ओळखपत्रावर बारकोड लावण्यात आले होते़१ हजार ७७५ पोलीस कर्मचारी सभेच्या ठिकाणी तैनातशहरातील मालेगाव रोडवरील गोशाळेच्या मैदानावरील सभेसाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे़ त्यात १ पोलीस अधीक्षक, ८ अपर पोलीस अधीक्षक, २० उपविभागीय अधीकारी, ४६ पोलीस निरीक्षक, २०० सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, १५०० पोलीस कर्मचारी असे एकूण १७७५ पोलीसांचा ताफा सज्ज झाला आहे़ बाहेरगावाहून येणाºया नागरिकांनी सकाळी नियोजित पार्कीेगस्थळी वाहने पार्कीगला सुरूवात केली आहे़ सभेसाठी ३५ एसपीजी पथक आले होते़ त्यात पोलिस महासंचालक दर्जाचा अधिकारी या पथकाचा समावेश होता़ सभास्थळ, सभोवतालचा परिसर, हॅलिपॅड, नियोजन-बंदोबस्त तसेच महामार्ग-मुख्यालयापासूनचे अंतर याची मायक्रो माहिती घेतली आहे.
शहराला आले होते छावणीचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:13 PM