आॅनलाईन लोकमतधुळे : मंगळवारी भाऊबीज साजरी करून दिवाळी सणासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. त्यामुळे सर्वच बस गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली होती. प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून एस.टी. महामंडळानेही जादा बसेसचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीपुढे जादा गाड्यांची संख्याही कमी पडू लागलेली आहे.नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त मुबंई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह विविध ठिकाणी असलेले नागरिक, विद्यार्थी दिवाळीसाठी गावी येत कुटुंबासमवेत वर्षातील हा सर्वात मोठा सण साजरा करीत असतात.यावर्षी शासकीय कर्मचाऱ्यांना २५ ते २९ आॅक्टोबर अशी सलग पाच दिवसांची सुटी असल्याने, बाहेरगावी असलेले नागरिक मोठ्या संख्येने गावी आले होते. त्याचबरोबर खाजगी कंपनीत काम करणाऱ्यांनाही दोन-तीन दिवस सुटी असल्याने, ते देखील आपापल्या गावी आले होते. यावर्षी दिवाळीतही पाऊस असला तरी सण साजरा करण्याचा उत्साह किरकोळही मावळला नव्हता. बुधवारपासून सर्वच कार्यालये नियमित सुरू होतील. त्यामुळे भाऊबीज सण साजरा करून गावी आलेल्या चाकरमान्यांचा नोकरी, शिक्षणाच्या ठिकाणी मंगळवारी दुपारपासूनच परतीचा प्रवास सुरू झाल्याने गाड्यांना गर्दी वाढली आहे.भाडेवाढीचा परिणाम नाहीऐन दिवाळीच्या कालावधीत एस.टी.महामंडळाने १० टक्के हंगामी भाडेवाढ केलेली असली तरी त्याचाही कुठलाच परिणाम झालेला दिसत नाही.नाशिक बायपाससाठी रांगामंगळवारी नाशिकला जाणाºया सर्वच प्रवाशांनी बायपासने जाण्यास प्राधान्य दिले होते. नाशिक बायपासचे बुकींग करण्यासाठी धुळे बसस्थानकावर रांगा लागलेल्या होत्या. रांग वाढल्यामुळे इतर गाड्यांच्या चालकांना बस फलाटाला लावतांना कसरत करावी लागत होती. बाहेरगावाहूनही नाशिकसाठी बसेस येत होत्या. मात्र बायपासमध्ये हमखास जागा मिळत असल्याने, अनेकांनी बायपासनेच प्रवास केला.ग्रामीण भागातीलगाड्यांनाही गर्दीकेवळ मुंबई, पुणे औरंगाबादकडे जाणाºया बस गाड्यांनाच गर्दी आहे, असे नाही तर अमळनेर, चोपडा, जळगाव, सुरत आदी गावांकडे जाणाºया सर्वच गाड्यांना सध्या प्रचंड गर्दी होत आहे. रविवारपर्यंत गर्दी कायम राहण्याचा अंदाज आहे.
धुळे बसस्थानकाला आले यात्रेचे स्वरूप, चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 11:58 AM