लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विखरण ता़ शिंदखेडा येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या अंत्यसंस्कारानंतर पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांची भूमिका प्रसार माध्यमासमोर मांडत माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरुध्द अबु्रनुकसानीचा गुन्हा दोंडाईचा पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास दाखल केला़ दोंडाईचा येथे उभारण्यात येणाºया सौर उर्जा (पूर्वीचा औष्णिक) प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्राण पणाला लावून पाठपुरावा करणारे विखरण ता़ शिंदखेडा येथील वयोवृध्द शेतकरी धर्मा पाटील (८०) यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री रावल यांनी भूमिका विषद केली होती़ माजी मंत्री नवाब मलिक यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यावर मुंबईत आरोप केले होते़ त्यावर मंत्री रावल यांनी मलिक यांचा समाचार घेतला़ त्यानंतर मंत्री रावल हे आपल्या कार्यकर्त्यांसह दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल झाले़ त्यांनी माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली़ त्यानुसार भादंवि कलम ४९९, ५०० नुसार गुन्हा नोंदविण्यात आला़ पुढील कामकाज सुरु आहे़
नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 1:17 PM
दोंडाईचा : मंत्री रावलांवर केलेला आरोप भोवणार
ठळक मुद्देदोंडाईचा पोलिसात मंत्री जयकुमार रावल यांची तक्रारनवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखलआरोपामुळे प्रकरण गाजण्याची शक्यता