शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

‘प्लास्टिक’च्या वापरावर कारवाईची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:15 PM

महापालिका : शहरात पिशव्याचा सर्रास होतोय वापर, जनजागृतीचा अभाव

धुळे : ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीकच्या पिशव्या वापरण्यास बंदी असतांनाही या पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे़ महापालिका व संबंधित प्रशासकीय यंत्रणा याविरूध्द कारवाई करीत नसल्याने प्लास्टीकच्या पिशव्यांचा वापर वाढत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे़शहरात प्लास्टीक पिशव्यांचा वापर होत असल्याने याबाबत नागरीकांची मते जाणून घेतली़ ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात प्लास्टीक पिशव्यांच्या वापराबाबत नागरीकांनी आपली स्पष्ट मते नोंदविली आहेत़ बंदी असतांना प्लास्टीक पिशव्यांचा वापर केला जात आहे काय ? या प्रश्नावर ५२ टक्के नागरीकांनी शहरात प्लास्टीकच्या पिशव्या वापरल्या जात असल्याचे सांगितले़ १६ टक्के नागरीकांनी नाही असे उत्तर दिले तर ३२ टक्के नागरीकांनी मात्र सांगता येत नाही, असे उत्तर दिले आहे़ प्लास्टीक पिशव्या वापरावर बंदी घातल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून दोषींवर कारवाई होते का ? या प्रश्नाच्या उत्तरात ५६ टक्के नागरीकांनी कारवाई होत नसल्याचे स्पष्ट केले आहे़ २० टक्के नागरीकांनी कारवाई होत असल्याचे सांगितले तर २४ टक्के नागरीकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले़महापालिका प्रशासन कारवाई करीत नसल्यानेच प्लास्टीक पिशव्यांचा वापर होत असल्याचा आरोप यावेळी नागरीकांनी केला़प्लास्टीक पिशव्यांमुळे पर्यावरणाची हानी होत आहे का ? या प्रश्नावर उत्तर देतांना ७२ टक्के नागरीकांनी प्लास्टीक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होते, हे मान्य केले आहे़ १२ टक्के नागरीकांनी नाही असे उत्तर दिले तर १६ टक्के नागरीकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले आहे़ प्लास्टीक मुक्तीसाठी जनजागृती केले जाते का, या प्रश्नावर ४६ टक्के नागरीकांनी नाही असे उत्तर दिले़ २६ टक्के नागरीकांनी होय असे सांगितले तर २८ टक्के नागरीकांनी मात्र सांगता येत नाही, असे उत्तर दिले़ प्लॅस्टिकमुक्त शहर होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढे येण्याची गरज व्यक्त होत आहे़शहरी भागातच अधिक वापऱ़़प्लास्टीक पिशव्यांचा वापर नेमका कोणत्या भागात होत आहे़ या विषयी नागरीकांना प्रश्न विचारला तेव्हा ६२ टक्के नागरीकांनी शहरी भागात प्लास्टीक अधिक वापर होत असल्याचे सांगितले़ २० टक्के नागरीकांनी अधिक वापर होत असल्याचे सांगितले तर १८ टक्के नागरीकांनी सांगता येत नाही असे उत्तर दिले़नागरीकांवरही कारवाई कराप्लास्टीक पिशव्यांचा वापर होतांना आढळल्यास व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाते़ वर्षभरापूर्वी अशा कारवाया झाल्या आहेत़ प्लास्टीकच्या पिशव्या वापरतांना आढळल्यास व्यापाऱ्यांबरोबर ग्राहक नागरीकांवरही कारवाई व्हावी का? असा प्रश्न विचारला तेव्हा ५२ टक्के नागरीकांनी होय असे उत्तर दिले आहे़ १८ टक्के नागरीकांनी नाही असे उत्तर दिले तर ३० टक्के नागरीकांनी सांगता येत नाही, असे उत्तर देवून प्रश्नाला बगल दिली़

टॅग्स :Dhuleधुळे