डॉ. लखन सिंग यांनी प्रशिक्षणार्थींना अधिकाधिक नफा मिळविण्यासाठी बाजारपेठेशी जोडले जाणारे विविध उत्पादक, शेती प्रणालीचे मॉडेल,अधिक उत्पन्न उत्पादन उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.
डॉ. शरद गडाख यांनी एकात्मिक शेती प्रणाली शेतकऱ्यांची आर्थिक वाढ कशी टिकवून ठेवते याबद्दल मार्गदर्शन केले. केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे यांनी फळ भाजीपाला क्षेत्रातील महत्त्व, व्याप्ती, संधी याविषयी माहिती दिली. कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल देसले यांनी दुग्धव्यवसाय प्रक्रियेचे महत्त्व सांगितले.
प्रास्ताविक कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. धनराज चौधरी यांनी केले. प्रशिक्षणात २०० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींचा सहभाग होता. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी डॉ. पंकज पाटील, जगदीश काथेपुरी, डॉ. अतिश पाटील, प्राची काळे, जयराम गावीत, स्वप्नील महाजन, बाळू वाघ, कुमार भोये, यशवंत मासुळे, जीवन राणे यांनी सहकार्य केले.