लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विकसित अनुभवातूनच साहित्याची निर्मिती होत असते़ वाचन आणि त्याची गोडी लहानपणापासूनच अंगिकारायला हवी़ ग्रंथ हेच वाचनाचे प्रभावी माध्यम आहे़ जगाचे आकलन हे वाचनाने होत असते़ त्यामुळे वाचन संस्कृती जोपासण्याची गरज असल्याचा सूर गं्रथोत्सवातील परिसंवादातून उमटला़ उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्टÑ राज्य, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित धुळे ग्रंथोत्सव २००१७ या उत्सवात ‘प्रभावी वाचन माध्यमे’ या विषयावर रविवारी परिसंवाद पार पडला़ परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी साक्रीचे प्रा.एल़ जी़ सोनवणे होते़ परिसंवादामध्ये प्रा़ सदाशिव सूर्यवंशी, प्रा़ विलास चव्हाण, प्रा़ डॉ़ पुष्पा गावित आणि प्रा़ फुला बागुल यांनी सहभाग घेतला होता. प्रा़ विलास चव्हाण म्हणाले, काळ बदलत असून चारित्र्य संपन्न साहित्याची निर्मिती होणे गरजेचे आहे़ लोकांपर्यंत पोहचण्यासाठी वाचन आणि अभ्यास महत्वाचे आहे़ हे दोन अडथळे पार केले तर वाचनाचे महत्व समजू शकेल़ सतत वाचनाचा सराव करायला हवा़ वाचनातूनच सुयोग्य असे साहित्य पोहचविले जात असते़ डॉ. फुला बागुल म्हणाले, माहितीचा स्फोट हा प्रचंड प्रमाणात होत आहे़ हा स्फोट विझविण्यासाठी योग्य प्रकारचे अर्थात ग्रंथाचे वाचन करायला हवे़ सोशल मीडीयातून निर्माण होणारे साहित्य किती तग धरु शकतात यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला़ ग्रंथातून चैतन्य, जिवंतपणा निर्माण होत असल्याचेही सांगत ग्रंथातून मनुष्य घडत असतो, असेही ते म्हणाले़ डॉ. पुष्पा गावीत म्हणाल्या, आपण काय वाचन करतो, व्यक्तिमत्वावर त्याचा किती प्रभाव पडतो हे पाहणे गरजेचे आहे़ मातृभाषा जोपासत असताना वाचन संस्कृती देखील जोपासण्याची गरज आहे़ वाचनाने आपल्यात संस्कार रुजत असतात़ त्यातून आपली जडण घडण होत असते़ येणाºया पिढीसाठी ग्रंथ हेच उपयोगी राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला़ अध्यक्षीय भाषणात प्रा.सोनवणे यांनी सुरुवातीला परिसंवादात उमटलेल्या विचारांचा परामर्श घेतला़ आजच्या काळात परिवर्तन करत असताना मस्तक आणि पुस्तक याशिवाय पर्याय नाही़ त्यांचा मेळ योग्य पध्दतीने लावण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.दुपारी कवी संमेलनानंतर या ग्रंथोत्सवाचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्या रत्ना पाटील होत्या. यावेळी रमेश बोरसे, प्रभाकर शेळके, डॉ. सचिन चिंगरे, सतीष पेंढारकर, मंगला रोकडे आदी उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सतीश पाटील, जगदीश देवपूरकर, वाहेदअली काझी यांनी केले.
वाचन संस्कृती जोपासण्याची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 9:46 PM
दोनदिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप : ‘प्रभावी वाचन माध्यमे’ विषयावर आयोजित परिसंवादातील सूर
ठळक मुद्दे धुळ्यातील गं्रथोत्सवाचा समारोप‘प्रभावी वाचन माध्यमे’ या विषयावर परिसंवाद साहित्यिकांसह अनेकांची होती उपस्थिती