लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विचार करण्यासाठी जोखीम उचलण्याची गरज आहे. कॉ.गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, एम. कलबुर्गी यांनी ती घेतली होती, असे सांगून विचार करणारा एकदाच मारला जातो. परंतु न विचार करणारा हा मेल्यासारखाच असतो, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व संमेलनाच्या राज्य संयोजन समिती सदस्य उत्तम कांबळे यांनी रविवारी येथे केले. या साहित्य संमेलनासाठी वेगवेगळी पार्श्वभूमी लागते, अण्णाभाऊ निमित्त असतात असे सांगून नुकत्याच झालेल्या निवडणुकांमुळे तयार झालेल्या नव्या राजकारणाची पार्श्वभूमी यावेळी लाभल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकशाही, राजकारण, समाजकारणाने यू टर्न घेतला आहे. नियुडणुकांचा निकाल पाहता त्यांचे ८० वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. धक्कादायक हा टर्न देण्याचे काम ज्यांनी केले त्या मतदारांना सुजाण करण्याबाबत आपणास अपयश आल्याचे निकालावरून स्पष्ट होते, असेही कांबळे यांनी नमूद केले. मात्र बदल हा नियम असून कोणतेही संकट कायमसाठी येत नाही. त्यामुळे ज्यांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला, होतो आहे त्यांना हा बदलाचा विश्वास द्यालया हवा, असेही ते म्हणाले. येथील हे अधिवेशन खºया अर्थाने राज्य व राष्टÑीयस्तरीय झाले. राज्यातील बार्शी, मुंबई, औरंगाबाद अशा विविध भागातून लोक, कार्यकर्ते येथे आले.कार्यकर्त्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांसह संमेलनासाठी परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांचा कांबळे यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यात गोपाळ निंबाळकर, आबासाहेब थोरात, नवल पाटील, सुरेश बिºहाडे, प्रा.सुनिता पाटील, भाऊसाहेब वानखेडे, दीपक बैसाणे, जयश्री ठाकरे,उर्मिला वाघ, प्रतिमा मोरे, मोहन मगरे आदींचा समावेश होता. यावेळी रवींद्र वाकळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा मान्यवरांना भेटीदाखल देण्यात आल्या. आभार उषा वाघ यांनी मानले.
विचारांसाठी जोखीम घेण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:14 AM