लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शिरपूर वरवाडे नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियान (नागरी) घनकचरा व्यवस्थापन निधी अंतर्गत कचरा संकलनाच्या ७ घंटागाडया नव्याने खरेदी करण्यात आल्या असून सर्व गाडयांची पूजा व शुभारंभ लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.यापूर्वी शिरपूर वरवाडे नगरपरिषदेकडे ४०० कि.ग्रॅ. वजन क्षमतेच्या ४ घंटागाड्या, ९०० कि.ग्रॅ. क्षमतेच्या ६ टिप्पर शहरात कचरा संकलनाचे काम करत आहेत.या सर्व गाडयांना जीपीएस प्रणाली कार्यान्वित असून नवीन खरेदी करण्यात आलेल्या सर्व गाड्यांना जीपीएस प्रणाली लावण्यात येणार आहे. शिरपूर वरवाडे नगरपरिषद शहरात १०० टक्के संकलन करत आहे.नवीन खरेदी करण्यात आलेल्या गाड्यांमुळे शहरातील कचरा संकलनाचे व स्वच्छतेचे काम अजून लवकर व प्रभावीपणे होईल.सदर कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, मुख्याधिकारी अमोल बागुल, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, नगर अभियंता माधव पाटील, माजी नगरसेवक रज्जाक कुरेशी, युसूफ बेग, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र अहिरे, स्वीय सहाय्यक सुनील जैन, पोर्णिमा पाठक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.
कचरा संकलनासाठी नवीन ७ गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 11:01 PM