शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

राष्टÑवादी काँग्रेसमध्ये नव्या-जुन्याचा वाद उफाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 1:21 PM

माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या अवतीभोवतीच फिरत राहिले

राजेंद्र शर्माजिल्ह्यात काँग्रेस पाठोपाठ आता राष्टÑवादी काँग्रेसतर्फे पक्ष संघटन उभे करण्यासाठी प्रदेशतर्फे पक्ष निरीक्षक म्हणून अविनाश आदिक आणि अर्जून टिळे हे जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले. जिल्हा दौºयात दोघांनी तालुकानिहाय आढाव बैठकी घेतल्या. या आढावा बैठकीत शिरपूर आणि धुळे तालुका राष्टÑवादी काँग्रेसच्या बैठकीत गोंधळ झाला होता. पक्षात नवा व जुना असा वाद उफाळून आला होता. तेव्हा पक्ष निरीक्षकांनी शेवटी यावर तोडगा काढीत वन टू वन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आढावा बैठकीत बºयाच पदाधिकाऱ्यांनी संघटन मजबुतीसाठी आणि पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी नवीन लोकांना संधी देण्यात यावी, अशी मागणी केल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले.तसे पाहता सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील राष्टÑवादीचे राजकारण हे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या अवतीभोवतीच फिरत राहिले आहे. त्यांनीच जिल्ह्यात राष्टÑवादीला चेहरा दिला. शिंदखेडा तालुक्यातून माजी आमदार डॉ.हेमंत देशमुख यांची त्यांना साथ मिळाली होती.पण डॉ.हेमंत देशमुख हे जेव्हा दोंडाईचा येथे एकाकी पडले, तेव्हा त्यांनी राष्टÑवादीला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीआधी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी पक्षाची साथ सोडत अपक्ष उमेदवारी केली आणि निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश केला. या दोन्ही नेत्यांनी पक्षत्याग केल्यानंतर राष्टÑवादी काँग्रेसमध्ये राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, माजी जिल्हाध्यक्ष किरण गुलाबराव पाटील, इर्शाद जहागीरदार, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष रणजीतराजे भोसले अशी बोटावर मोजण्याइतकीच मंडळी उरली होती. या जुन्या मंडळींसोबत विधानसभा निवडणुकीनंतर शिरपूर तालुक्यातून डॉ.जितेंद्र ठाकूर आणि धुळ्यातून माजी आमदार अनिल गोटे यांनी राष्टÑवादीत प्रवेश केला. गोटे यांना पक्षाने प्रदेश उपाध्यक्षपद आणि धुळे व नंदुरबार जिल्हा प्रभारी म्हणून पक्ष संघटन उभे करण्याची जबाबदारी दिली. पक्ष प्रवेशानंतर माजी आमदार गोटे यांनी दोन्ही जिल्ह्यांचा दौरा केला. दौºयात त्यांनी पक्षावर निष्ठा ठेवणाºयांना स्थान आहे. मात्र, पक्षाचा झेंडा घेऊन दुसºयाचे काम करणाºयांना स्थान नाही, असे ठणकावून सांगितले होते. परंतू कोरोना महामारीच्या संसर्गानंतर त्यांच्या दौºयांना ब्रेक लागला आहे. दरम्यानच्या काळात पक्ष निरीक्षक अविनाश आदिक आणि अर्जून टिळे हे गेल्या आठवडयातच जिल्हा दौºयावर आले. त्यात पक्षात नव्या- जुन्याचा वाद उफाळून आला. या दौºयाच्या वेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्ह्याचे प्रभारी माजी आमदार अनिल गोटे हे बैठकीस उपस्थित नव्हते. तसेही त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षांच्या ज्या बैठकी झाल्यात त्यात अगदी बोटावर मोजण्या इतक्याच बैठकींना उपस्थिती दिली आहे. त्याप्रमाणेच पक्ष निरीक्षकांच्या या बैठकीसही ते उपस्थित नव्हते. ते कामानिमित्त मुंबईला असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले. त्यानंतर गोटेंच्या नेतृत्वाखाली धुळयातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा निर्यातबंदीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच नव्या - जुन्या नेत्यांनी हजेरी लावली. पक्ष निरीक्षकांसमोर उफाळून आलेला नवा - जुन्याच्या वादावर लवकर पडदा पडणे, हे पक्ष संघटनच्या दृष्टीने आवश्यक असल्याने प्रदेश उपाध्यक्ष म्हणून माजी आमदार अनिल गोटे आणि पक्ष निरीक्षकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रदेश राष्टÑवादी काँग्रेसचे नेते यावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.काँग्रेसमधील नेतृत्व बदलाचे वारे- राष्टÑवादी सोबतच जिल्ह्यातील त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसमध्येही आता जिल्ह्यात नेतृत्व बदलाचे वारे वाहत आहेत. आतापर्यंत जिल्हा काँग्रेसवर अँकर गटाचे वर्चस्व होते. जवळपास सर्वच प्रमुख पदे त्यांच्या गटाकडे होती. परंतू अँकर गटाचे प्रमुख नेते माजी आमदार अमरिशभाई पटेल यांच्या भाजप प्रवेशानंतर अँकर गट संपल्यात जमा झाला आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीण मतदारसंघातून विजय मिळविणारे आमदार कुणाल पाटील यांचे जिल्ह्यात वर्चस्व वाढले आहे. त्याचे चित्र जिल्हा युवक काँग्रेस आणि अन्य नियुक्तीमध्ये स्पष्ट दिसते. पक्षात शिल्लक असलेल्या अँकर गटातील नेतेमंडळींनीही आता आमदार कुणाल पाटील यांच्याशी जमवून घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात पक्ष निरीक्षक मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील तालुकानिहाय झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांना मंत्रीमंडळात स्थान देण्याची मागणी केली. शेवटी धुळे तालुक्याच्या बैठकीत पक्ष निरीक्षक मुझफ्फर हुसेन यांनी लवकरच त्यांच्यावर जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोपविण्यात येईल, असे स्पष्ट संकेत दिले. पण विद्यमान जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर हे १२ वर्ष या पदाची धुरा सांभाळत आहेत. ते अँकर गटाचे मानले जातात. पण अँकर गटाचे सर्व प्रमुख नेते भाजपमध्ये गेल्यानंतरही त्यांनी पक्ष सोडला नाही. म्हणून आता त्यांच्याकडून जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी काढून घेतांना त्यांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यांचे पुनर्वसन केल्यानंतरच जिल्हाध्यक्ष पदाची धुरा आमदार कुणाल पाटील यांना दिली जावी, असा एक नवीन विचार पुढे येत आहे. दरम्यानच्या काळात काँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे हे देखील बदलले आहेत. त्यामुळे आता हा विषय थोडा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे