कुठल्याही निवडणुका असल्या की मतदानाचे यंत्र, कर्मचारी यांना संबंधित मतदान केंद्रावर नेण्यासाठी व परत घेऊन येण्यासाठी एस.टी.गाड्या बुक केल्या जातात, तसेच जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा अभ्यास दौरा, सहल असल्यास एस.टी.ची. नोंदणी केली जाते; मात्र नोंदणी करतानाच एस.टी.कडे नियमानुसार भाडे भरावे लागत असते. त्यानंतरच एस.टी. उपलब्ध करून दिली जात असते. त्यामुळे एस.टी.ची. एकाही विभागाकडे थकबाकी नसल्याचे विभाग नियंत्रक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, लॅाकडाऊन झाल्यामुळे बससेवा दुसऱ्यांदा बंद झालेली आहे. फेऱ्याच नसल्याने, विभागाला उत्पन्नही मिळेनासे झालेले आहे. असे असले तरी दैनंदिन खर्च व कर्मचाऱ्यांचा पगार सुरू आहे. त्यासाठी मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून पैसा उपलब्ध होत आहे. त्यामुळे तूर्ततरी पगार व खर्च सुरू आहे.
मालवाहतुकीचा आधार
एस.टी. महामंडळाची प्रवासी सेवा बंद असली तरी मालवाहतूक सेवा सुरू आहे. विभागात ४९ मालवाहतूक ट्रक असून, त्यांच्या माध्यमातून १९ मे पर्यंत विभागाला ८ लाखांचे उत्पन्न मिळालेले आहे.
कोणाकडेही थकबाकी नाही...
धुळे विभागाची एकाही विभागाकडे थकबाकी नाही. आगाऊ पैसे भरल्याशिवाय एस.टी. उपलब्ध करून दिली जात नाही. दरम्यान, लॅाकडाऊनमुळे सध्या बससेवा बंद आहे. त्यामुळे उत्पन्न नाही; मात्र खर्चासाठी मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडून पैसे उपलब्ध करून दिले जात आहेत.
- मनिषा सपकाळ,
विभाग नियंत्रक,धुळे.
लॅाकडाऊनमुळे बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे एस. टी.ला मिळणारे उत्पन्नही कमी झालेले आहे. सध्या पगार मिळतो आहे; मात्र अशीच स्थिती राहिली तर पुढे पगार कसा होईल, याची चिंता आहे.
- एक कर्मचारी.
सध्या पगार मिळतो आहे, ही समाधानाची बाब आहे; मात्र अशीच परिस्थिती राहिली तर संसार, मुलांची शिक्षणे कशी करावी, याची आतापासूनच चिंता सतावत आहे. यावर पर्याय निघाला पाहिजे.
- एक कर्मचारी
बससेवा सुरू ठेवावी
कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी खासगी वाहने सुरूच आहेत. त्याप्रमाणेच एस.टी.चीही सेवा मर्यादीत का असेना सुरू ठेवावी. त्यामुळे काही प्रमाणात तरी एस.टी. महामंडळाला उत्पन्न मिळू शकणार आहे.