शिरपूर : तालुक्यातील आमोदे येथे २ महिला कोरोना बाधित आढळल्यामुळे शहरासह ४ गावे गुरूवारपर्यंत कंटेन्मेंट झोनमध्ये होती़ मात्र कंटेन्मेंट झोन उठल्यामुळे शहरात शुक्रवारी बहुतांशी दुकाने पुर्ववत सुरू झाली़ दुकाने उघडल्यामुळे नागरिकांची वर्दळ वाढली, मात्र प्रशासनाने काही वेळातच जीवनावश्यक दुकाने वगळता उर्वरीत दुकाने बंद केलीत़ १७ मे पर्यंत लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे़ दरम्यान, सकाळीच दारू दुकानांसमोर दारू घेणाऱ्यांनी तोबा गर्दी केली, लांबच लांब रांगा झाल्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला़ प्रशासनाने लागलीच हस्तक्षेप करीत सोशल डिस्टन्स ठेवत दारू विक्री सुरू केली़८ रोजी दारूचे दुकाने उघडणार असल्यामुळे मद्यपींनी सकाळपासूनच लांबच लांब गर्दी केली होती़ मात्र दुकानदारांनी सकाळी १० वाजेनंतर दुकाने उघडलीत़ शहरातील महाराजा कॉम्प्लेक्स समोरील दारूचे दुकान उघडल्यामुळे एकच गर्दी झाल्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला़ त्यामुळे दुकानदारांनी काही वेळातच दुकाने बंद केली़ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मद्यपींना प्रसाद देत रांगेत उभे करण्याचे सूचित केल्यानंतर पुन्हा दारू दुकाने सुरू झालीत़ दुकानासमोर बॅरेगेटस् लावून व सुरक्षित अंतराचे चौकोन तयार केल्यानंतर दिवसभर दारू विक्री सुरू होती़ भर उन्ह्यात दारू दुकांनासमोर तुरळक गर्दी होती, तर काही दुकानांसमोर रांगा होत्या़लॉकडाऊनच्या काळात कंटेन्मेंट झोन वगळून घाऊक, ठोक विक्रेते व किरकोळ मद्य विक्रीचे दुकाने सुरू करण्याबाबत प्रशासनाने काही अर्टी-शर्तींसह परवानगी दिली़ त्यामुळे वाईन शॉप, बिअर शॉप व देशी दारू किरकोळ विक्रीचे व्यवहार सुरू करण्यात आले़ यासाठी दारू विक्रेत्यांसाठी मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत़ नियमांचे उल्लंघन करणाºयांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे़दरम्यान, शुक्रवारी शहरातील बहुतांश दुकाने उघडल्यामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती़ अखेर प्रशासनाने लागलीच जीवनावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर लगेच बंद करण्यात आली़ रमझानचा महिना सुरू असल्यामुळे मुस्लीम बांधवांना नवे कपडे घेण्यासाठी दुकाने बंद असल्यामुळे आज काही कापड दुकाने सुरू करण्यात आली होती़ मात्र गर्दी होताच प्रशासनाने ती बंद करायला भाग पाडले़कंटेन्मेंट झोन उठल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी अनेकांनी आपआपली दुकाने उघडलीत़ सामाजिक अंतर पाळण्याचे बंधन गळून पडले़ फिजिकल डिस्टन्सिंगचा अक्षरक्ष: फज्जा उडाला़ पोलिसांच्या धाकाने सुनसान झालेले रस्ते गजबजले़दारूची दुकाने दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर (किमान ६ फूट) ठेवून चालू ठेवण्यास परवानगी आहे. दुकानात एका वेळी पाच पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित नसतील याची दक्षता घ्यावी.सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, पान तंबाखू खाणे यास मनाई आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक आहे. पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई आहे. लग्नसमारंभास ५० पेक्षा अधिक लोकांना आणि अंत्यसंस्कारास २० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल.नियमांचे उल्लंघन करणारे नागरीक व व्यावसायिक यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा आणि सीआरपीसी १४४ अन्वये कठोर कारवाई केली जाईल. याकाळात शहर अथवा परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यास अशा ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषीत जाहीर केला जाईल. आणि वर दिलेल्या तरतूदी रद्द करण्यात येतील़
अवघ्या काही वेळातच पुन्हा झाले सर्व बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 10:11 PM