शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

आता वेध जिल्हा परिषद निवडणुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 1:26 PM

पडघम : गट-गणनिहाय मतदार याद्या विभाजनाचे काम पूर्ण, निवडणूक आयोगाच्या पुढील आदेशाची प्रशासनाला प्रतीक्षा

धुळे : विधानसभेपाठोपाठ आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे  वेध अनेकांना लागले आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गट आणि गणनिहाय मतदार याद्या विभाजनाचे काम पूर्ण झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) उन्मेश  महाजन यांनी दिली आहे.धुळ्यासह राज्यातील पाच जिल्हा परिषदा व पंचायत समितींची मुदत डिसेंबर २०१८ मध्येच संपली आहे. या  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी २७ आॅगस्ट २०१८ रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मात्र आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने त्यावर हरकत घेण्यात आली होती. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान राज्य शासनाने जिल्हा परिषदेला मुदतवाढ दिली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने शासनाने दिलेली मुदतवाढ रद्द करून, आॅगस्ट महिन्यात कार्यकारिणी बरखास्त केली. उच्च न्यायालयातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यापूर्वी झालोल्या सुनावणी दरम्यान नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या लोकसंख्येची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने दोन महिन्यांची मुदत मागितली होती. ती मुदत २७ आॅक्टोबरलाच संपुष्टात आलेली आहे. ही माहिती वेळेत न दिल्यास राज्य निवडणूक आयोग १९ जुलै २०१९च्या आदेशाप्रमाणे विद्यमान आरक्षणाच्या आधारावर निवडणूक कार्यक्रम तत्काळ जाहीर करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीच्यावेळीच दिलेले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.राजकीय पक्षांकडून निवडणुकीची चाचपणी सुरू*धुळे जिल्हा परिषदेचे एकूण ५६ गट असून, ११२ गण आहेत. पूर्वीच्या नियोजनानुसार अगोदर जिल्हा परिषद निवडणूक नंतर विधानसभेची निवडणूक होणार होती. मात्र आरक्षणाचा वाद न्यायालयात पोहचल्याने, नियोजित वेळेत जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ शकलेली नाही. दरम्यान नुकतीच विधानसभेची निवडणूक आटोपली आहे. यात धुळ्े शहर मतदार संघातून एमआयएम, धुळे ग्रामीण मतदार संघातून कॉँग्रेस, शिरपूर, शिंदखेडा मतदार संघातून भाजप व साक्री विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला आहे. *इतर पक्षांच्या मानाने भाजपला या निवडणुकीत एका जागेचा लाभ झालेला आहे. तर कॉँग्रेसला दोन जागांचे नुकसान सोसावे लागले आहे. या निवडणुकीत शिवसेना व राष्टÑवादी पक्षाने प्रत्येकी एक-एक जागा लढविली होती. मात्र त्यांना यश आलेले नाही. *विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आधारावर राजकीय पक्षांना आगामी काळात होणाºया जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची चाचपणी सुरू केलेली आहे. आगामी महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होण्याची शक्यता असल्याने, इच्छुकांनीही तयारी सुरू केलेली आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांचा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत कोणाला लाभ मिळतो याचीही आकडेमोड करण्यात राजकीय पक्षांचे पदाधिकारी व्यस्त झालेले आहेत. 

टॅग्स :Dhuleधुळे