धुळे - जिल्ह्यात सोमवारी एकूण १६२ रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १० हजार पार गेली. एकूण रुग्ण संख्या १० हजार ३४ झाली आहे. सोमवारी कोरोनाने उपचार घेत असतांना सात रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतकांची संख्या २९३ झाली आहे.सोमवारच्या अहवालांनुसार, धुळे शहरातील ७२ तर ग्रामीण भागातील ९० अशा एकूण १६२ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या १० हजार ३४ इतकी झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह सात रुग्णांचा मृत्यू झालेला आहे़ त्यात धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथील ५८ आणि नेहरुनगरातील ६० वर्षीय पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर धुळे शहरातील देवपुरातील ७८ वर्षीय तर विद्यानगरीतील ७२ वर्षीय आणि जुने धुळयातील ५८ वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचार घेतांना मृत्यू झाला. याशिवाय शिरपूर आणि दोंडाईचा येथील रुग्णांचा नाशिक येथे खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.जिल्हा रुग्णालय धुळे येथील १६४ अहवालांपैकी १९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे़ त्यात, तिखी १, शिंदखेडा १, सोनगीर १, काळखेडे १, स्टेशन रोड १, सोंडले शिंदखेडा १, वलवाडी १, बाळापुर १, सुभाष नगर २, जमनागिरी रोड २, फागणे १, बळसाने १, दराणे शिंदखेडा १, जुने धुळे १, इंद्रप्रस्थ नगर १, मोहाडी १, सातरणे १़उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १४५ अहवालांपैकी ४६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात तावखेडा १, थाळनेर ४, भाटपुरा १, बालाजीनगर शिंगावे १, बोराडी ५, पिळोदा २, वाघाडी १, करवंद २, बालकुवा १, कळमसरे १, होळनांथे २, रुदावली १, ताजपूरी १, वर्षी १, मांजरोद १, क्रांतीनगर १, वरवाडे १, स्टेट बँक कॉलनी २, मतिमंद वस्तीगृह १, रामसिंग नगर १, सोलर सिटी १, मराठे गल्ली २, पुंडलिक नगर १, माळी गल्ली १, जनता नगर १, कोर्टाजवळ २, शिरपूर इतर ६, पिंप्राळ शिंदखेडा १़भाडणे साक्रीमधील ३५ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात, जैताणे १, निजामपूर १, दुसाणे १़ भाडणे साक्रीमधील रॅपिड अँटीजन टेस्टच्या ७१ अहवालांपैकी १० अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. म्हसदी २, दुसाने १, जामदे २, सामोडे रोड पिंपळनेर १, सटाणा रोड पिंपळनेर २, मंगलमूर्ती नगर पिंपळनेर २़महानगरपालिका पॉलिटेक्निकमधील ६९ अहवालांपैकी २३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात तुळशीराम नगर १, सुदर्शन कॉलनी १, श्रीराम नगर २, केले नगर १, मोहाडी १, श्रीकृष्ण नगर १, भावसार कॉलनी १, साक्री रोड ३, सुभाष नगर ३, राका पार्क वलवाडी ३, शिवम नगर १, अलंकार नगर १, जय हिंद कॉलनी १, जे बी रोड १, मनपा १, वलवाडी १़शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ५३ अहवालांपैकी १७ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. त्यात, लक्ष्मी नगर १, शासकीय विद्यालय २, धुळे इतर ३, स्टेशन रोड १, चितोड रोड १, फागणे १, मुकटी १, शिरपूर २, देवपूर १, आर्वी १, दोंडाईचा १, साक्री रोड १, मोहाडी १़खासगी लॅबमधील १०३ अहवालांपैकी ४४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. धान्य गोडाऊन जवळ १, अविष्कार कॉलनी २, भिडे बाग ३, मुक्ताईनगर २, रामनगर १, शाहूनगर १, साई कृपा हौसिंग सोसायटी १, फुले कॉलनी १, सत्यसाईबाबा हाऊसिंग सोसायटी १, गल्ली नं चार १, स्टेट बँक कॉलनी १, विद्यानगर १, साक्री रोड १, सैलानी कॉलनी १, क्षीरे कॉलनी १, सप्तशृंगी कॉलनी १, देवपूर २, आनंद नगर १, शांतीनाथ नगर १, शिवपार्वती कॉलनी १, वलवाडी १, अंबोडे २, गरताड १, हेंद्रुण १, धनुर २, नगाव १, फागणे १, थाळनेर १, शिरपूर १, शिंदखेडा ३, निमगूळ ३, मांडळ १, रावळ नगर दोंडाईचा १़
धुळ्यातील कोरोना रुग्णसंख्या १० हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 10:15 PM