धुळे- शुक्रवारी तब्बल २१ रूग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या १०२ वर पोहोचली आहे. धुळे शहरात १५ रूग्ण आढळले आहेत. साक्री व शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येकी दोघांना लागण झाली आहे तर शिरपूर व धुळे तालुक्यातील एका रूग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील रूग्णसंख्या १०२ वर पोहोचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 9:02 AM