लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :रविवारी आणखी २२३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला.मृतांमध्ये, धुळे शहरातील चितोड रोड परिसरातील रुग्णाचा समावेश आहे. तसेच धुळे तालुक्यातील फागणे,न्याहळोद व वडजाई येथील पुरुष, साक्री तालुक्यातील हट्टी व शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील पुरुषाचा हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.रविवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील १५८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील २०, शिंदखेडा तालुक्यातील २१, शिरपूर तालुक्यातील दोन व साक्री तालुक्यातील २२ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ७००९ इतकी झाली आहे.
बाधितांच्या संख्येने ७ हजाराचा टप्पा ओलांडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 9:04 PM