धुळे : आचारसंहितेचा भंग आणि जमावबंदीचे आदेश झुगारुन घोषणाबाजी केल्याप्रकरणी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार पंढरीनाथ मोरे आणि त्यांच्या समर्थकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़पंढरीनाथ चैत्राम मोरे (रा़ सोनबर्डी, ता़ एरंडोल जि़ जळगाव) हे शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास भारतीय ट्रायबल पार्टीतर्फे लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या समर्थकांसह जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आले़ जमावबंदीचे आदेश आणि आचारसंहिता लागू असल्याबाबत पूर्णपणे जाणीव असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले़ एकत्र गर्दी करत घोषणाबाजी केली़ सार्वजनिक शांततेचा भंग केला़ जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन केले़ त्यामुळे याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीनुसार उमेदवार पंढरीनाथ मोरे यांच्यासह त्यांच्या १५ समर्थकांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.
उमेदवारासह समर्थकांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 1:46 PM