आॅनलाइन लोकमतधुळे : राष्टÑीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत राज्यांतर्गत अभ्यास दौऱ्यासाठी धुळे जिल्ह्यातील जि.प. सदस्य, सरपंच, ग्रामसेवकांचे पथक औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श व उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायतीच्या दौºयावर गेले होते. यात दौºयात त्या-त्या ग्रामपंचायतीने राबविलेले उपक्रमांची पहाणी करून आपल्या भागात राबविण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील याचा अभ्यास केला जाणार आहे. असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी आर.एन. शेळके यांनी ‘लोकमत’ला दिली.५ मार्चपासून या दौºयाला सुरूवात झाली होती.या अभ्यास दौºयासाठी चाळीस जणांच्या नावांची शिफारस केली गेली होती. मात्र त्यापैकी २६ जण दौºयावर गेले होते.यात साक्री तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य मधुकर बागुल, साक्री पंचायत समिती सदस्य गणपत चौर,विश्वास बागुल, धुळे पंचायत समितीचे उपसभापती दीपक भदाणे, देऊरचे (ता. धुळे) सरपंच हेमांगी देवरे, नंदाळेचे सरपंच योगेश पाटील, तावखेडा (ता.शिंदखेडा) येथील सरपंच प्रदीप रोकडे, शिरपूर तालुक्यातील करवंतच्या मनिषा पाटील, ग्रामपंचायत सदस्य धनलाल पवार, सहायक गटविकास अधिकारी एस.पी.पवार शिरपूर, शिंदखेडाचे विस्तार अधिकारी बी.बी.गरूड, ग्रामविकास अधिकारी आर.एन.कुवर, ग्रामसेवक पी.पी.घुगे, समुदाय साधन व्यक्ती संध्या बागुल, विस्तार अधिकारी एन.आर.पाटील, अंगणवाडी सेविका आर.बी.पावरा यांच्यासह ग्रामपंचायत विभागाचे हेमंत पवार, रमेश शेळके आदींचा या यात समावेश होता.या तीन दिवसाच्या कालावधीत ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील उत्कृष्ट व आदर्श कार्य केलेल्या ग्रामपंचायतींना भेटी देण्यात आल्या. या पथकाने पोखरी येथील जिल्हा परिषद शाळेलाही भेट दिली.या पथकाने पाटोदा, वळसगाव, पोखरी, उबेफळ, मुरलवाडी, विसारवाडा या ग्रामपंचायतींना भेटी दिल्याचे सांगण्यात आले.