धुळे : माझ्या नियोजित जागेवर मंगल कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले आहे़ त्यासाठी महापालिकेने मला परवानगी देखील दिली आहे़ केवळ राजकिय हेतूने अधिकाऱ्यांनी कारवार्ई करू नये, आधी नोटीस बजावावी मगच कारवाई करा अशी भूमिका घेतल्याने घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता़पांझरा नदी काठावरील दुतर्फा अठरा मीटर रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासुन सुरू आहे़ जुने धुळे भागातील कानुश्री मंगल कार्यालयापासून हायवेपर्यत जाणाºया रस्त्याच्या कामात मंगल कार्यालयाची भिंत अडथडा ठरत असल्याने सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक सदरील भिंत हटविण्यासाठी गेले होते़ हीबाब मंगल कार्यालयाचे संचालक सुनिल माळी यांना कळताच त्यांनी मंगल कार्यालयाकडे धाव घेतली़ सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एजाज शेख यांच्याशी शाब्दीक चमकम झाली होती़ अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार मंगल कार्यालयास कारवाई करण्यापूर्वी नोटीस बजावण्यात आली आहे़ परंतू नोटीस स्वीकारली नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले़ तर माळी यांनी नोटीस दिलेली नसल्याचा वाद सुरू होता़ अठरा किलो मीटर रस्त्याच्या कामात मंगल कार्यालयाची भिंत अडथळा ठरत असल्याचे एजाज शेख यांनी नकाशावरून पटवून दिले़ मात्र केवळ राजकीय षडयंत्र असल्याने मंगल कार्यालयाची भिंत पाडण्यात येत असल्याचा आरोप संचालक माळी यांनी केला़ मंगल कार्यालयाचे बांधकाम पूर्णपणे कायदेशीरित्या करण्यात आले आहे़ सर्व प्रकारच्या परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत़ महापालिकेची कोणत्याही प्रकारची थकबाकी नाही़ अधिकाºयांनी कारवाई करण्याआधी नोटीस बजावा मग आम्ही खुलासा असे माळी यांनी सांगितले़ अधिकारी शेख व माळी यांचा शाब्दीक वाद आझाद नगर पोलिस ठाण्याचे पीआय दिनेश आहेर यांच्या मध्यस्थी सोडविण्यात आला़ दरम्यान शेख यांनी नोटीस बजावण्यात येईल असे सांगत कारवाई मागे घेत असल्याचे सांगितले़ त्यामुळे अधिकाºयांना कारवाई न करता मागे फिरावे लागले होते़
अधिकाऱ्यांनी आधी नोटीस बजवावी, मग कारवाई करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:40 PM