धुळे : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना शहरातील सहजीवन नगर परिसरात गावठी पिस्तूल (कट्टा)सह एकास अटक केली आहे. सुरज जाधव (२७) रा. मोहाडी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून स्थानिक गुन्हे शाखे (एलसीबी)च्या पथकाने ही कारवाई केली.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र, अग्निशस्त्र याबाबत कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ यांनी दिल्या आहेत. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाईसाठी सहजीवन नगरात पाठविले.पथकाने त्या परिसरात सापळा लावून सुरज जाधव यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील गावठी पिस्तूल ताब्यात घेऊन कारवाई केली.पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उगले, पोलीस हेडकॉन्स्टेबल रफिक पठाण, संदीप थोरात, पोलीस नाईक प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सानप, मयुर पाटील, अशोक पाटील, किशोर पाटील, योगेश जगताप, तुषार पारधी व श्रीशेल जाधव यांचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली.
गावठी पिस्तूलसह एक आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 10:26 PM