शहराची गावे समाविष्ट केले गेली, मात्र या गावांमध्ये मूलभूत सुविधांसदर्भात सातत्याने ओरड होती. ही बाब लक्षात घेऊन या गावातील विविध विकासकामांबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे अवधान, मोरोणे तसेच वलवाडी तीन गावांसाठी रस्त्याचे काँक्रिटीकरण, गटार व डांबरीकरणासाठी निधीची मागणी आमदार फारुख शाह यांनी केली होती. त्यानुसार या गावांसाठी १ कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.
यांनी केली होती मागणी
महापालिकेकडून हद्दवाढीच्या गावांसाठी अल्पनिधी मिळाला आहे. त्यामुळे आजही गावातील मूलभूत प्रश्न सुटू शकलेले नाही. तातडीने विकास कामे व्हावीत यासाठी अवधान, मोराणे आणि वलवाडी येथील नगरसेविका सारिका अग्रवाल, निंबाबाई भिल व वंदना भामरे यांनी आमदार शाह यांचेकडे विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली होती.