पिंपळनेर, जि.धुळे, दि.5- साक्री तालुक्यातील जामखेल येथे पूर्ववैमनस्यातून चाकूने वार करून एकाचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. सुरेश मोतीराम थवील (वय 35) असे मृताचे नाव आहे. त्याला ग्रामीण रूग्णालयात नेत असतांना वाटेतच निधन झाले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी विजय पवार हा फरार झाला आहे.
सहा वर्षापूर्वी सुरेश थवील (मयत) याच्या प}ीला विजय लक्ष्मण पवार याने फूस लावून पळवून नेले होते. त्यामुळे थवील यांचा संसार उदध्वस्त झाला होता. तेव्हापासून दोघांमधील वाद कायम होता.
सुरेश थवील हा शुक्रवारी सकाळी जामखेल गावाबाहेर गुरे, बक:या चारत असताना त्या ठिकाणी विजय पवार पोहचला. तेथे त्यांच्यात वाद होऊन पवार याने आपल्याकडील चाकूने थवील याच्यावर हल्ला केला. अन्य गुराख्यांनी ही घटना पाहून गावाकडे धाव घेत नागरिकांना बोलविले. थवील यास येथील ग्रामीण रूग्णालयात आणत असतांनाच वाटते त्याची प्राणज्योत मालवली.