धुळे :तापी नदीच्या पात्रात उडी घेऊन शिंदखेडा येथील रहिवाशी ३८ वर्षिय इसमाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.अशोक भालेराव पाटील (रा. आदर्श कॉलनी प्लॉट नं.२३, शिंदखेडा, मुळ गाव अनवर्दे, ता. चोपडा) हे पत्नीसोबत दुचाकीने चोपडा येथील दवाखान्यात जाण्यासाठी निघाले होते. अशोक पाटील यांनी पत्नीला गलंगी फाट्यावर उतरवून मोटारसायकल लावून येतो असे सांगून निघून गेले. मात्र बराचवेळ झल्याने ते परत आले नाहीत. त्यानंतर त्यांचे नातेवाईक नंदलाल दंगल पाटील, सुरेश भालेराव पाटील आदींनी त्यांचा शोध सुरू केला. नातेवाईक सुकवद येथे तापी नदीजवळ अले असता, त्यांना अशोक पाटील यांची मोटारसायकल तापी नदीच्या पुलाजवळ उभी असलेली दिसली. तसेच त्याच्या पायातील चपलाही मोटारसायकलजवळ आढळल्या. अशोकने पाण्यात उडी मारल्याचा अंदाज आल्याने, पटट्टीच्या पोहणाऱ्यांनी त्याचा मृतदेह पाणतून बाहेर काढला. त्यास शिंदखेडा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तापी नदीत उडी मारून एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:23 PM