धुळे : येथील बाजार समितीत शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर कांदा दाखल झालेला आहे़ त्यात लाल कांदा १२ हजार क्विंटल तर पांढरा कांदा ३ हजार क्विंटल इतका दाखल झाला़ सायंकाळी उशिरापर्यंत सर्व कांदा प्रशासनाकडून खरेदी करण्यात आला आला़ शनिवारपासून तो व्यापाऱ्यांकडे आणि तेथून किरकोळ विक्रीसाठी बाजारात दाखल होणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले़ दरम्यान, सोमवारपासून टोकन पध्दत अवलंबिली जाणार आहे़ त्यानुसार गुरुवारी त्या शेतीमालाची खरेदी केली जाईल़कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार दैनंदिन सर्व व्यवहार ठप्प झाले होते़ ३० मार्च रोजी शेतकऱ्यांनी आपला कांदा धुळ्यातील बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता़ त्यावेळी सायंकाळपर्यंत ११ हजार क्विंटल कांदा दाखल झाला होता़ त्याची खरेदी व्यापाºयांकडून झाल्यानंतर तो किरकोळ विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करुन देण्यात आला होता़ यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार बंद करण्यात आल्यामुळे शेतकºयांना आपला कांदा विक्रीसाठी अडचणी येत होत्या़ कोणत्याही प्रकारचे वाहन शेतकºयांजवळ उपलब्ध होऊ शकत नव्हते़ सर्व काही ठप्प झाले असतानाच त्याचे पडसाद धुळे नजिक सर्व जिल्ह्यातील बाजार समिती, उपसमिती देखील बंद होत्या़शेतीमाल विक्रीसाठी आणण्याठी शासनाच्या प्रादेशिक परिवहन विभागाकडून हिरवा कंदिल मिळाल्याने शेतकºयांनी आपला कांदा धुळ्यातील बाजार समितीत विक्रीसाठी आणला़ जवळच असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सटाणासह अन्य ठिकाणाहून कांदा धुळ्यात दाखल झालेला आहे़ त्यात लाल कांदा हा १२ हजार आणि पांढरा कांदा ३ हजार क्विंटल असा एकूण १५ हजार क्विंटल कांदाची आवक झाली आहे़ सकाळ आणि दुपारच्या सत्रात असे दोनवेळा कांदाचा लिलाव करुन तो प्रशासनाने खरेदी केला़ लाल कांद्याचा भाव ४५० रुपये क्ंिवटल तर पांढºया कांद्याचा भाव ७३० रुपये क्ंिवटल दर निश्चित करण्यात आले़ शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत लिलाव प्रक्रिया सुरु होती़दरम्यान, धुळ्यातील बाजार समितीत येणाºयांचे सॅनिटायझर केले जात असून प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे सचिव पाटील यांनी सांगितले़सोमवारपासून टोकनशेतकºयांनी आपला शेतीमाल अचानक विक्रीसाठी आणल्यामुळे गोंधळ निर्माण होतो़ शेतकºयांना अपेक्षित भाव देखील मिळू शकत नाही़ यामुळे सोमवारपासून टोकन पध्दत सुरु केली जाणार आहे़ ज्यांना टोकन मिळेल त्यांनी गुरुवारी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणायचा आहे, असे ठरविण्यात आले़कांद्याची खरेदी २२ एप्रिलपर्यंत बंदधुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा या शेतीमालाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार गुरुवार २३ एप्रिल पासून पूर्ववत सुरु होण्यासाठी प्राथमिक नाव नोंदणीची प्रक्रिया सोमवार २० एप्रिल २०२० पासून येथील बाजार समितीच्या कार्यालयात टोकन पध्दतीने सुरु करण्यात येत आहे़शेतकºयांनी बाजार समितीच्या कार्यालयात नमूद तारखेपासून आपली नाव नोंदणी, मोबाईल क्रमांक, गावाचे नाव, वाहनाचा प्रकार, शेतीमालाचा प्रकार, अंदाजीत वजन याची माहिती घेऊन सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाजार समितीच्या कार्यालयात सुटीचे दिवस सोडून समक्ष संपर्क साधावा़शनिवार १८ एप्रिल ते बुधवार २२ एप्रिल २०२० पर्यंत कांदा या शेतीमालाचे खरेदी-विक्रीचे व्यापार व्यवहार बंद राहतील़ या दिवसात कोणीही शेतकºयाने आपला शेतीमाल धुळे येथील बाजार समितीत विक्रीसाठी आणू नये़नोंदणीच्या ठिकाणी गर्दी करु नये, प्रत्येकाने मास्क लावावा, सुरक्षित अंतर ठेवावे असे आवाहन सभापती सुभाष देवरे यांनी केले आहे़शेतकºयांनी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणत असताना स्वच्छ करुन आणावा़ तो आणत असताना थोड्याप्रमाणावर आणावा़ त्याला भाव देखील चांगला मिळू शकतो़- दिनकर पाटीलसचिव, बाजार समिती धुळे
धुळ्यातील बाजार समितीत कांदा झाला ‘उदंड’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 9:29 PM