धुळे : जिल्ह्यात रविवारी रात्री ठिकठिकाणी वादळी वाºयासह अवकाळी पाऊस झाला. यात चौगाव येथे विज कोसळल्याने ५०० क्विंटल कांदा जळून खाक झाला. तर वसमार येथील शाळेवरील पत्रे उडून विजेच्या पोलवर जाऊन आदळले. सुदैवाने येथे रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला. शहरात रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. तर शिरपूर शहरासह तालुक्यातील सांगवी, पळासनेर भागात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. ५०० क्विंटल कांदा जळून खाक धुळे तालुक्यातील चौगाव येथे रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. यावेळी शेतकरी ओंकार उदेलाल महाले यांच्या शेतातील कांदा चाळीवर वीज कोसळली. या कांदा चाळीत सुमारे ५०० क्विंटल कांदा भरलेला होता. वीज कोसळल्याने कांदा चाळीसह कांदा जळून खाक झाला असून शेतकºयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी सोमनाथ पाटील, माजी सरपंच सिताराम बागले, सरपंच रामकृष्ण पाटील, माजी उपसरपंच कृष्णा माळी, कमलाकर गर्दे, रघुनाथ महाले, मंडळ अधिकारी किरण कांबळे, तलाठी कविता हाके व शेतकरी उपस्थित होते. वसमार येथे अनर्थ टळला म्हसदी- साक्री तालुक्यातील वसमार पुनर्वसन गावाला लागून पश्चिमेस शिवाजी माध्यमिक विद्यालय आहे. येथे रविवारी रात्री वादळी वाºयासह अवकाळी पाऊस झाला. वादळामुळे शाळेच्या चार वर्गखोल्यांवरील पत्रे शंभर फूट अंतरावर उडून इलेक्ट्रिक पोलवर जाऊन आदळले. इलेक्ट्रीक पोलवर पत्रे आदळल्यामुळे येथे मोठा अनर्थ ओढवला असता. परंतू सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला. याबाबत विद्यालयाच्या शिक्षकांनी महसूल विभागास माहिती दिली. तलाठी विजय बावा यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेमुळे विद्यालयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. निजामपूरला रात्रभर वीज गायब निजामपूर- वादळी वाºयासह विजेच्या कडकडाटात रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास परिसरात अवकाळी पाऊस झाला. यामुळे विज गेल्याने नागरिक उकाड्याने अक्षरश: हैराण झाले. पूर्वी साक्री येथून मुख्य वीज वाहिनीवरुन जैताणे उपकेंद्र जोडलेले होते. आता केवळ ४ कि.मी. अंतरावरील शिवाजीनगरच्या सोलर प्रकल्पावरून जैताणे उपकेंद्र जोडलेले असतांना सुद्धा रात्रभर उपकेंद्राचा वीज पुरवठा बंद असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत होते. जैताणे वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता रोहित पाटील व त्यांच्या सहकाºयांनी सोलरकडून येणाºया मुख्य वीज वाहिनीचा ‘फॉल्ट’ शोधण्यासाठी रात्रभर प्रयत्न केले. अखेर शिवाजीनगरजवळ ‘फॉल्ट’ सापडला व सकाळी वीज पुरवठा
चौगावला वीज कोसळल्याने कांदा जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:17 PM