धुळे : पावसाचा जोर वाढत असून त्याचा थेट परिणाम कांद्याच्या भावावर झाल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीत गेल्या महिन्याभरापासून कांद्याची आवक घटत असून, परिणामी कांद्याचे भाव ६० रूपयांवर पोहचले आहेत. त्यामुळे कांदा आता सर्वसामान्याचा डोळ्यात पाणी आणू लागला आहे़जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनासह चाळींमध्ये साठवून ठेवलेल्या कांद्याचेही नुकसान झाले. परिणामी कांद्याची आवक घटतच आहे. त्यात जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असून, शेतकऱ्यांचा उरलेल्या कांद्याचेही नुकसान होत असल्याने बाजार समितीत कांदा येत नसल्याने कांद्याला भाव मिळत आहे. नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, सिन्नरसह इतर बाजार समितीमध्ये कांद्याला उच्चांक वाढत असल्यामुळे याचा परिणाम किरकोळ विक्रेत्यांवर झाला आहे़ त्यामुळे सध्या बाजारात कांदा ४० ते ५० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री होत आहे.कांद्याचे भाव कडाडलेयापूर्वी २० ते २५ रूपये किलो दराने विकला जाणाºया कांद्याचे भाव प्रतिकिलो ४५ ते ५० रूपये किलो दराने विकला जात आहे. चढ्या दराने कांदा विकला जात असल्याने, ग्राहकांच्या डोळ्यातही अश्रु येवू लागले आहेत. धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजारपेठेत साक्री, पिंपळनेर, शिरपूर, मालेगाव या परिसरातून कांद्याची आवक होत असते. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारपेठेत १२५० क्विंटल कांद्याची आवक झालेली होती. कांद्याला ४१५० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीतून मिळाली.
कांद्यांनी आणले डोळ्यात ‘पाणी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 1:09 PM