लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहराच्या ४० टक्के भागाला पाणीपुरवठा करणाºया नकाणे तलावात केवळ २६ दिवस पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक असून मनपाने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. त्याचप्रमाणे १ कोटी ८४ लाख रुपयांची पाणीपट्टी भरावी, अशी नोटीस पाटबंधारे विभागाने मनपा प्रशासनाला बजाविली आहे़ केवळ २६ दिवसांचा साठामहापालिका क्षेत्राचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे़ त्यामुळे मनपाचा पाणी वापरदेखील वाढत असून दररोज मनपाकडून अधिक पाणी उचलले जाते़, त्यावर पाटबंधारे विभागाने यापूर्वीदेखील आक्षेप घेतला आहे़ दरम्यान, मनपाच्या अधिक पाणी वापरामुळे सद्य:स्थितीत नकाणे तलावात केवळ १़४६ दलघमी (५१़५६ दलघफू) पाणीसाठा शिल्लक आहे़ मनपा दररोज २ दलघफू पाणी वापरत असल्याने सद्य:स्थितीत केवळ २६ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन करून काटकसर आवश्यक असल्याचे पाटबंधारे विभागाने दिलेल्या नोटिसीत नमूद आहे़तर पुन्हा पाणीटंचाईपावसाळा सुरू होण्यास काही दिवस उरले असले, तरी दरवर्षीचा अनुभव पाहता जून महिन्यात पाऊस होईलच; याची शाश्वती नसते़ त्यामुळे वेळेवर पाऊस न झाल्यास शहराला पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो़ काही दिवसांपूर्वी जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती़ त्यातच आता नियोजन न झाल्यास जून महिन्यात पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागू शकतो़ थकबाकीचेही स्मरणपाटबंधारे विभागाची पाणीपट्टी न भरल्याने जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस नकाणे तलावाचा पाणीपुरवठा पाटबंधारे विभागाने खंडित केला होता़ त्यानंतर मार्चमध्येही मनपाला सातत्याने नोटिसा बजाविण्यात आल्याने जवळपास ५० लाख रुपयांचा भरणा मनपाने यापूर्वी केला आहे़ तरीदेखील अजून १ कोटी ८४ लाख १३ हजार रुपये पाणीपट्टीची थकबाकी असून ती तत्काळ भरण्यात यावी, असेही नोटिसीत नमूद करण्यात आले आहे़अक्कलपाडातून पाण्याची मागणी़़़अक्कलपाडा प्रकल्पातून नकाणे तलावात पाणी सोडण्यात यावे, यासाठी मनपाकडून जिल्हाधिकाºयांशी पत्रव्यवहार सुरू करण्यात आला असला, तरी त्यासाठी पाठपुरावादेखील आवश्यक आहे़ शहरात निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईस जबाबदार धरून मनपा प्रशासनाने पाच अभियंत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला होता़ त्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन तत्काळ करावे लागणार आहे़
केवळ २६ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक!
By admin | Published: May 24, 2017 12:21 AM