धुळे : राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी असलेल्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तिसºया टप्प्यात मंजूर १,४८० कामांपैकी आतापर्यंत ६ कामे पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरीत १,४७१ कामे ही ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर राहणार आहे. नोव्हेंबर महिन्यात राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी धुळ्यात घेतलेल्या आढावा बैठकीत मार्च २०१८ पर्यंत प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे प्रशासनला सूचित केले होते. या बैठकीनंतर जवळपास दोन महिन्याचा कालावधी उलटूनही केवळ सहा कामे पूर्ण झाली आहेत. प्रलंबित कामांचा निपटारा करण्याचे निर्देश जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तिसºया टप्प्यात (२०१७-१८) जिल्ह्यातील ९५ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये एकूण १, ४८० कामेही केली जाणार होती. त्यापार्श्वभूमीवर नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयांतर्गत येणाºया जिल्ह्यांची जलयुक्त शिवार योजनेची आढावा बैठक ही धुळ्यात घेतली होती. त्याचवेळी त्यांनी प्रलंबित कामांचा तत्काळ निपटारा करून तिसºया टप्प्यातील कामे ही मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेचे काम संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. कामांसाठी ५५ कोटींची तरतूद तिसºया टप्प्यासाठी मंजूर कामांसाठी आराखड्यात ५५ कोेटी ७० लाख ५४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तिसºया टप्प्यासाठी धुळे जिल्ह्यात ९५ गावांची निवड करण्यात आली होती. त्यात धुळे तालुका २४, साक्री २४, शिंदखेडा २४ व शिरपूर तालुक्यातील २३ अशा एकूण ९५ गावांची निवड करण्यात आली आहे. वास्तविक, या कामांना १५ नोव्हेंबरपासून सुरुवात करण्यात आली होती. एकूण कामांपैकी ६५ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. तर ४२३ कामे ही ई-निविदा प्रक्रियेत असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
जि.प.च्या लघूसिंचन विभागानेच उघडले खातेतिसºया टप्प्यातील १४८० कामांपैकी कृषी विभागातर्फे सर्वाधिक ६३९ कामे केली जाणार आहे. तर जि.प.च्या लघूसिंचन विभागातर्फे २९१, लघुसिंचन (जलसंधारण) ८२, धुळे पाटबंधारे विभाग ७, वनविभाग ११७, भुजल सर्व्हेक्षण विभाग २६९, पंचायत समिती (नरेगा) ६१, सामाजिक वनीकरण ६ तर अशासकीय यंत्रणेमार्फत ८ कामे केली जाणार आहेत़ पैकी जि.प.च्या लघुसिंचन विभागाने ६ कामे पूर्ण केली आहेत़ तर उर्वरीत विभागांनी अद्याप खातेही उघडलेले नाही़
दुस-या टप्प्यातील कामेही अपूर्ण जलयुक्त शिवारची दुसºया टप्प्यातील (२०१६-१७) काही कामे ही पूर्ण होऊ शकलेली नाहीत. दुसºया टप्प्यात १२३ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये २, ५९५ कामे केली जात आहेत़ पैकी ७५ टक्के म्हणजेच १, ६३७ कामेच पूर्ण होऊ शकली आहेत़ विशेष, म्हणजे सुमारे ४०० कामांना अद्याप सुरुवातही झालेली नाही़ त्यामुळे आता प्रशासनापुढे दुसºया व तिसºया टप्प्यातील कामे पूर्ण करण्याचे आव्हान राहणार आहे.