शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

मालेगावच्या रूग्णांना उपचारासाठी विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 10:07 PM

जिल्हाधिकाऱ्यांना सर्ववक्षीय निवेदन : लोकप्रतिनिधीसह संघटना, डॉक्टर, कर्मचारी एकवटले

धुळे : मालेगाव येथील कोरोनाबाधित रूग्णांना धुळ्यात उपचारास आणण्यासाठी आता सर्वच पक्षातर्फे विरोध होऊ लागला आहे. भाजपा,शिवसेना, मनसेने तसेच विविध संघटनातर्फे ही रूग्ण आणण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. तर सायंकाळी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी देखील काम बंद आंदोलनाचा पावित्रा घेतला होतो़हिरे रूग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचाही विरोधहिरे वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय कर्मचाºयांनी शुक्रवारी निदर्शने करीत जिल्हाधिकाºयांची भेट घेत शासन निर्णयाला विरोध केला़ या आंदोलनात महाविद्यालयातील डॉक्टर व विविध विभागातील तंंत्रज्ञ सहभागी झाले होते. हिरे महाविद्यालयाची २५० बेडची क्षमता असतांना कोरोनामुळे ५५० खाटापर्यंत वाढवण्यात आली आहे. मनुष्यबळ मात्र तेवढेच आहे. त्यामुळे मालेगाव येथील रूग्णांवर उपचार करणे शक्य होणार नाही अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची पदे रिक्त आहेत़ त्यामुळे महा विद्यालयातील यंत्रणेवर प्रचंड ताण पडत असल्याचे आंदोलक डॉक्टरांनी सांगितले.कुंभ मेळाव्याचे नियोजन करता येते मग, रूग्णांचे नियोजन का नाही?मालेगाव येथील कोरोना बाधित रूग्ण नाशिक सोडून धुळ्यात आणण्याचा घाट घातला जात आहे वास्तविकता बघता मालेगाव नाशिक जिल्ह्यात येते़ मालेगावचा सर्व महसूल नाशिक जिल्ह्यात जातो़ ज्या नाशिक जिल्ह्यात कुंभमेळा आयोजन करता येवू शकते़ त्या नाशिक जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था होऊ शकत नाही क ? या मागे काही राजकीय दबाव आहे. व बाधित रूग्ण धुळ्यात आणले तर त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक देखील धुळ्यात येतील व धुळ्यातले नाते सबंध बघता हे शहरासाठी धोकेदायक ठरू शकतो़ जिल्हाबंदीचे उल्लंघन करून धुळ्यात रूग्ण आणले जात आहे़ प्रशासनाने तातडीने निर्णय रद्द करावा अन्यथा शहराच्या सुरक्षिततेसाठी स्त्यावर उतरेल असा इशारा मनमसे राज्य सचिव प्राची कुलकर्णी, मनसे जिल्हाध्यक्ष दुष्यांत देशमुख, जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख आदी दिला आहे़कर्मचाºयांवर कामाचा भार पडणार -राष्ट्रवादीजिल्ह्यात कोरोना रुग्णासाठी कार्यरत असलेले श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे एकमेव रुग्णालय आहे. तसेच तेथे कोरोना रुग्णा व्यतिरिक्त अन्य रुग्णसेवा देणे ही सुरु आहे. वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेले मनुष्यबळ अपुरे आहे. त्यात त्या मनुष्यबळाची कोविड विभाग व नॉन कोविड विभाग अशी विभागणी झाल्यामुळे डॉक्टर व इतर कर्मचाराºयावर कामाचा ताण येत आहे़ मालेगाव येथील बाधित रूग्ण तपासणी येतात़ गेल्या दोन महिन्यापासून येथील वैद्यकीय व पोलीस तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील यंत्रणा २४ तास अविरत सेवा देत असल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या मर्यादित ठेवणे शक्य झालेले आहे. मालेगाव येथील रुग्ण धुळे जिल्ह्यात पाठविण्यात आले तर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत केलेल्या जिल्हानिहाय नियोजनाला अर्थ राहणार नाही. तरी रूग््ण जिल्हात पाठवू नये अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांनी केली आहे़धुळ्याला धोका होऊ शकतोजिल्ह्यात सुरवातीला एकही कोरोना रुग्ण नव्हता़ मात्र पहिला रुग्ण मालेगावहून परत्याने बाधित झाल्याचे स्पष्ट झाले़ सध्यस्थितीत धुळ्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असतांना मालेगाव मधील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता तेथील रुग्ण धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्याच्या प्रशासनाने निर्णय घेतला आहे़ त्यामुळे भविष्यात धुळे शहराचा धोका नाकारता येत नाही़ प्रशासनाने सदरील निर्णय त्वरित रद्द करावा अशी मागणी अध्यक्ष दिनेश विभांडिक यांनी केली आहे़अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणारमालेगावमधून कोरोना बाधीत रुग्णांना उपचारासाठी धुळ्यात आणले जाणार असल्याचे कळताच मिल परिसरातील आठ नगरसेवकांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी दुपारी प्रविण अग्रवाल यांच्यासह नगरसेवकांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामराजे यांची भेट घेतली़ सध्या धुळ्याचा प्रवास रेड करुन ग्रीन झोनकडे होत आहे. मात्र मालेगावचे रुग्ण धुळ्यात आले तर धुळे पुन्हा रेड झोनमध्ये जाईल हिरे वैद्यकीय महाविद्यालया लगत मिल परिसर आहे. या परिसराला देखील धोका पोहचू शकतो म्हणून मालेगाव येथील बाधित रुग्ण धुळ्यात आणू नये. अन्यथा नगरसेवकांसह रस्त्यावर उतरले असा इशारा नगरसेवक दगडू बागुल, राजेश पवार, सुरेखा उगले, वंदना मराठे, राजेंद्र मराठे, शितल नवले, बंटी मासुळे, सुरेखा देवरे आदींनी दिला़

टॅग्स :Dhuleधुळे