धुळे,दि.9- शहरात गेल्या आठ दिवसांपासून विस्कळीत झालेला पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, असे आदेश आयुक्त संगीता धायगुडे यांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीत दिल़े शहरात सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली असून तक्रारींमध्ये वाढ झाली आह़े
शहराला पाणीपुरवठा करणा:या जलस्त्रोतांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध असतांना ऐन उन्हाळयात पाणीपुरवठय़ाचे नियोजन कोलमडले असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त होत असून अनेक भागात पाच ते आठ दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही़ एकिकडे तापमानाचा पारा 42 ते 44 अंशावर गेल्याने कमालीचा उकाडा निर्माण झालेला असतांना दुसरीकडे पाणीपुरवठय़ाचे संकट धुळेकरांवर कोसळले आह़े 22 गळत्यांची दुरूस्ती करण्यासाठी मनपाने 2 मे रोजी जलवाहिनी बंद केली होती़ त्यानंतर 3 मे ला सोनगीर गावासाठी पाणी सोडण्यात आल़े त्यानंतर दुरूस्तीचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरळीत झाला न झाला तोच नरडाण्याजवळ जलवाहिनीला पुन्हा गळती लागल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नासाडी झाली शिवाय दुरूस्तीमुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्यास आणखी विलंब झाला़ त्यामुळे अद्यापही शहरातील बहूतांश भागात आठ दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांची ओरड वाढली आह़े परिणामी, मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी सोमवारी सायंकाळी व मंगळवारी दुपारी बैठक घेऊन अधिका:यांची चांगलीच कानउघडणी केली़ दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन का कोलमडले? असा जाब विचारत आयुक्तांनी शक्य तितक्या लवकर सर्व भागात पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार अधिका:यांकडून पाणी पुरवठय़ाचे नियोजन सुरू असले तरी भारनियमनाचाही अडसर आह़े