धुळे : अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले. पाणी सोडतांना जुलैपर्यंत पुरेल असे नियोजन करून पाणी सोडण्याची सूचना त्यांनी केली आहे.अक्कलपाडा प्रकल्पातून फेब्रुवारी महिन्यात ३१० दशलक्ष घनफूट पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. आता पाणीपुरवठा विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे अक्कलपाडा प्रकल्पातून दुसरे आवर्तन सोडण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.पाणी सोडतांना पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहचेल अशापद्धतीने सोडावे अशाही सूचना करण्यात आलेल्या आहे.अतिरिक्त पाणी न सोडता, प्रकल्पातील पाणी जुलै अखरेपर्यंत पुरेल असे नियोजन करूनच सोडावे अशी सूचना आहे. याकरिता तीनही तालुक्यातील तहसीलदार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, वीज वितरण कंपनी, पोलीस प्रशासन, पाटबंधारे विभाग, तलाठी, ग्रामसेवक यांनी संयुक्तरित्या तत्पर रहावे. नदीपात्रात पाणी अडविणे, अवैधरित्या पाणी उपसा रोखण्यासाठी भरारी पथक नियुक्त करून कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. नदीपात्रातील कोल्हापूर बंधाºयाच्या फळ्या काढण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिले आहेत.अक्कलपाडा धरणातून पाणी सोडल्यास त्याचा फायदा धुळे, शिंदखेडा, व अमळनेर तालुक्यातील जवळपास १०० गावांना फायदा होणार आहे. पाणी सोडण्याच्या निर्णयाचे अनेक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलेले आहे.
अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 8:09 PM