शिरपूर,दि.5 - प्रत्येक नागरिकाने विज्ञानाचा प्रचार, प्रसार केला पाहिज़े परंतु भावी पिढय़ांना ख:या अर्थाने घडविण्याचे काम शिक्षक करतात म्हणून विज्ञानाचा प्रसार शिक्षकांनी केला पाहिज़े, असे प्रतिपादन पनवेल येथील डॉ़संतोष टकले यांनी ‘हे विश्वाचे अंतरंग आणि वैज्ञानिक दृष्टीकोन’ या विषयी मार्गदर्शन करताना केल़े
बोराडी येथील फॉर्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर किविप्र संस्थेतील सेवकांचे 33 व्या दोनदिवसीय शैक्षणिक शिबिरास गुरुवारी उदघाटन प्रारंभ झाला. यावेळी किविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, कार्याध्यक्षा आशा रंधे, जि़प़सदस्या सीमा रंधे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, लीलाताई रंधे, डॉ़सुमिता गवळी, नगरसेवक रोहित रंधे, सारिका रंधे, हर्षाली रंधे, पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे, प्राचार्य डॉ़एस़एऩपटेल, रणजित पाडवी, शामकांत पाटील, मुंबईचे किरण जोग, पुण्याचे सौमित्र घोटीकर, मनोज गोविंदवार, बी़डी़ पाटील, संजय गुजर, दीपक रंधे, ए़ए़ पाटील, क़ेडी़बच्छाव, भैय्या माळी, सीताराम माळी आदी उपस्थित होत़े
मुंबईचे किरण जोग यांनी वाचन, राजकारण आणि व्यवसायाच्या वेगळ्या वाटा याविषयी मार्गदर्शन केल़े प्रास्ताविक संस्थेचे सचिव निशांत रंधे तर सुत्रसंचालन संदीप चौधरी यांनी केल़े दुपारच्या सत्रात पुण्याचे सौमित्र घोटीकर यांचे खरंखुरं ई-लर्निग व जळगांवचे मनोज गोविंदवार यांचे मला भेटलेली माणसे या विषयांवर व्याख्याने झाली़
शिबिराचा आज समारोप
शुक्रवार 5 रोजी सकाळी 7़30 वाजता बोराडी येथील शिक्षणमहर्षी कर्मवीर व्यंकटराव रणधीर यांच्या स्मृती स्थळाला आदरांजली वाहिल्यानंतर संस्थेच्या मालकातर येथील नियोजित शाळा इमारत बांधकाम भूमिपूजन समारंभ केला जाणार आह़े त्यानंतर पुण्याचे डॉ़सागर देशपांडे यांचे शिक्षण कुरूक्षेत्र की गुरूक्षेत्र, कर्नाटकचे संतोष क्षीरसागर यांचे गुरूब्रम्ह, हास्यसम्राट प्रा़जित कोष्टी यांचे हसवणूक या विषयांवरील व्याख्यानांनंतर शिबिराचा समारोप होणार आह़े