शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

धुळ्यात शुक्रवारी मराठा क्रांती महामोर्चाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 5:13 PM

बैठकीत निर्णय : शिवप्रेमींना मोर्चात सहभागाचे आवाहन, व्यवहार राहणार सुरळीत

ठळक मुद्देसर्व अन्यायग्रस्त नागरिक, विद्यार्थी, पालक, व्यापारी यांनी मोर्चात सहभागी व्हावे़सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू ठेऊन मोर्चात सहभाग घ्यावा़मराठा क्रांती मोर्चा समन्वय समिती ठरवून देईल त्याच घोषणा द्याव्यात़मोर्चामध्ये स्वयंसेवकांच्या नियमांचे पालन करावे़हुल्लडबाजी करणाºयांना ताकीद देऊन बाहेर काढले जाईल़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर धुळयात निघालेल्या मोर्चादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गलिच्छ घोषणा आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या़ याप्रकरणी दोषींवर कारवाई न झाल्याने मराठा क्रांती मोर्चातर्फे शुक्रवारी १२ जानेवारीला सकाळी ११ वाजता आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापासून महामोर्चा काढण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला़ बैठकीस पोलिसांनी परवानगी नाकारली होती.मराठा क्रांती मोर्चाची बैठक रविवारी इंदिरा उद्यान परिसरात पार पडली़ या बैठकीस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे, माजी आमदार शरद पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, राजेंद्र इंगळे, साहेबराव देसाई, राजू महाराज, सुनिल चौधरी, नाना कदम, अ‍ॅड़एम़एस़पाटील, अ‍ॅड़ सचिन जाधव, निलेश काटे, गौरव पवार, अमोल मराठे, दिपक रवंदळे, अर्जुन मराठे यांच्यासह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़  भिमा कोरेगाव प्रकरणानंतर ३ जानेवारीला पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या दिवशी धुळयात  मोर्चा काढण्यात आला होता़ या मोर्चादरम्यान दुकानांवर व वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या़ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गलिच्छ घोषणा देण्यात आल्या होत्या़ त्याचप्रमाणे सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करण्यात आले़ या सर्व प्रकारांचे पुरावे देत मराठा क्रांती मोर्चाने दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती व कारवाई न झाल्यास प्रतिमोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता़ मात्र प्रशासनाकडून कारवाई न झाल्याने शुक्रवारी १२ जानेवारीला महामोर्चा काढण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला़ बैठकीस पोलिसांची परवानगी नव्हती - दरम्यान, रविवारी आयोजित बैठकीला पोलीसांनी परवानगी नाकारत दिलेले पत्र  बैठकीत फाडून टाकण्यात आले़ तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली