शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

अन्यथा कठोर पावलं उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 10:43 PM

साक्रीत आढावा बैठक : जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांचे सुचक विधान, यंत्रणा अलर्ट

साक्री : साक्री तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यावर कठोर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साक्री येथे आढावा बैठक घेण्यात आली़ या बैठकीत, कोरोना रुग्णांच्या संख्येत अजून वाढ होऊ नये म्हणून कठोरपणे कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिले आहेत़तसेच येत्या १५ दिवसात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता साक्री येथे एका आठवड्याच्या आत आॅक्सिजन सुविधायुक्त ५० बेड सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत़ तहसील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला आमदार मंजुळाताई गावित, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी वान्मथी सी यांनी मार्गदर्शन केले.साक्री तालुक्यात गेल्या एक महिन्यापूर्वी कोरोनाचे अल्प पेशंट होते़ परंतु एका महिन्यात जवळपास ५०० च्या आसपास कोरोना रुग्ण वाढल्याने लोकांमध्ये बेफिकिरी दिसून येत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश यावेळेस देण्यात आले़ त्यात बाजारात विना मास्क फिरणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे तसेच सोशल डिस्टंसिंग न पाळणाºया लोकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे़ त्यासोबत विवाह समारंभात किंवा अंत्यविधीत ५० पेक्षा जास्त लोक आढळून आल्यास त्यांच्यावर कोणतीही दयामाया न दाखवता गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत़ यासाठी संबंधित गावाचे पोलीस पाटील, ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ अशा कार्यक्रमांची व्हिडिओ शुटिंग करून ती पोलिसांना देण्यात येणार आहे़ कोरोना संदर्भात झालेल्या या बैठकीत लोकप्रतिनिधींनीही आपली मते मांडली़ यामध्ये पंचायत समितीचे उपसभापती अ‍ॅड़ नरेंद्र मराठे, साक्री नगरपंचायतचे गटनेते ज्ञानेश्वर नागरे, शिवसेनेचे पंकज मराठे, नितीन बेडसे, आदींनी आपले मते मांडली़ यावेळेस डॉ़ तुळशीराम गावित, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, गटविकास अधिकारी जी़ टी़ सूर्यवंशी, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बिडकर, तालुका आरोग्य अधिकारी साळुंके, साक्री पिंपळनेर निजामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते़कोरोना संकटाच्या मुकाबला करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी यात सहभागी होऊन येत्या पंधरा दिवसापर्यंत अतिशय काळजी घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे़ साक्री शहरात नगरपंचायत असून कठोर अंमलबजावणी करत बाजारात होणारी गर्दी नियंत्रणात आणावी नियमाचे पालन न करणाºया नागरिकांवर ही गुन्हे दाखल करण्यात यावेत असेही आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे