धुळे : विधानसभा निवडणुकीच्या मैदानात तेल लावून आमचे पेहलवान तय्यार आहेत़ मात्र, यात विरोधक कुठे दिसत नाही अशी टिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे तालुक्यातील नेर येथील सभेत केली़ राज्याच्या प्रचाराचा शुभारंभही त्यांनी या सभेच्या माध्यमातून केला़ धुळे ग्रामीण मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार ज्ञानज्योती भदाणे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते़ यावेळी उमेदवार ज्ञानज्योती भदाणे यांच्यासह खासदार डॉ़ सुभाष भामरे, मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भूसे, मनोहर भदाणे, राम भदाणे, माजी आमदार द़ वा़ पाटील यांच्या पत्नी सुशीला भदाणे यांच्यासह अन्य उपस्थित होते़ मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाजनादेश यात्रा तीन टप्यात आटोपल्यानंतर आता प्रचाराचा शुभारंभ धुळे ग्रामीण उमेदवाराच्या प्रचार सभेतून होत आहे़ हा शुभारंभ आमच्या मतदार संघातून करावा यासाठी राज्यातून ठिकठिकाणाहून आग्रह सुरु होता़ परंतु मताधिक्य सर्वाधिक मिळेल असा विश्वास असल्याने येथून हा शुभारंभ करत आहे़ते म्हणाले, काँग्रेस आघाडीची अवस्था फार बिकट होत आहे़ राहुल गांधी विदेश दौºयावर गेले आहेत़ पवारांची राष्ट्रवादी निम्मी रिकामी झाली आहे़ उर्वरीत मतदानानंतर ती रिकामी होईल, असं वाटतं़ सुशीलकुमार शिंदे म्हणतात मी थकलो आहे़ या पार्श्वभूमीवर दोन्ही काँग्रेसचे विलिनीकरण होऊ शकते अशी चिन्हे आहेत़ गेल्या १५ वर्षात काँग्रेस आघाडीची असलेली कामे पाहता आमच्या पाच वर्षात त्या पटीने कितीतरी विकासाची कामे आम्ही मार्गी लावली आहेत़ त्या जोरावरच मते मागायला पुन्हा आम्ही आलो आहोत़ असेही मुख्यमंत्री म्हणाले़ काँग्रेस आघाडीने तयार केलेल्या जाहीरनाम्याचा समाचार घेतला़
विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आमचे पेहलवान तय्यार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 3:55 PM