दोंडाईचा नगरपालिकेच्या सभागृहात कोरोनासंदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत आमदार जयकुमार रावल बोलत होते.
बैठकीत आमदार जयकुमार रावल, प्रांताधिकारी डाॅ. विक्रम बांदल, शिंदखेडा तहसीलदार सुनील सैंदाणे, अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, पो. नि. दुर्गेश तिवारी, पो. उपनिरीक्षक देविदास पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मोरे, कोविड सेंटरप्रमुख डॉ. हितेंद्र देशमुख, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण काटे, नगरसेवक रवींद्र उपाध्ये, कृष्णा नगराळे, जितेंद्र गिरासे, हितेंद्र महाले, भरतरी ठाकूर, डॉ. सचिन पारख, प्रफुल्ल दुग्गड, डॉ. जयेश ठाकूर, डॉ. तेजश जैन, डॉ. अनिकेत पाटील आदी उपस्थित होते.
आढावा बैठकीत शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयातील सुविधा, रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन सिलिंडर, कोरोनाबाधित रुग्ण, उपचार पद्धती यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार जयकुमार रावल म्हणाले की, दोंडाईचासह शिंदखेडा तालुक्यात कोरोनाबाधित वाढत आहेत. बाहेरून ऑक्सिजनची गरज वाढत आहे. त्यामुळे माझ्या आमदार निधीतून दोंडाईचा व शिंदखेडा येथे ऑक्सिजन प्लांटची उभारणी करावी. सद्य:परिस्थितीत कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असली तरी सर्वांनी काळजी घ्यावी. प्रशासनाने शहरात रेमडेसिविर, ऑक्सिजनचा तुटवडा होणार नाही याची काळजी घ्यावी.
उपजिल्हा रुग्णालयाचे आग, इलेक्ट्रिक,ऑक्सिजन ऑडिट लवकरच केले जाईल, असे प्रांतधिकारी विक्रम बांदल यांनी सांगितले.
फोटो- दोंडाईचा नगरपालिका कोरोना आढावा बैठकीत आमदार जयकुमार रावल, प्रांताधिकारी विक्रम बांदल व इतर.