धुळे : कुलस्वामिनी एकवीरादेवीच्या यात्रोत्सवानिमित्त गुरूवारी १८ एप्रिल रोजी मान-मानता, जाऊळ, शेंडी, कुळधर्म, अभिषेक, पूजा पाठ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ एकविरा देवी यात्रोत्सवानिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी होण्यास सुरूवात झाली आहे़ पहाटेपासून भाविक मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येत आहेत़ पहाटे ५, सकाळी ८, दुपारी १२, सायंकाळी ७ व रात्री ११़३० वाजा देवीची आरती होत असून आरतीच्या वेळी भाविकांच्या गर्दीत वाढ झाली आहे़ त्यादृष्टीने मंदिर ट्रस्टकडून भाविकांच्या काळजी घेण्यात आली आहे़ मंदिराच्या आवारात भव्य सभामंडप उभारण्यात आला आहेएकवीरादेवी मंदिरात आज मान मानता, जाऊळ, शेंडी, कुळधर्म, अभिषेक पूजा पाठ कार्यक्रम होतील़ यंदाही चिमुकल्यांचे जाऊळ काढण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे़ या कार्यक्रमांना खान्देशसह मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात राज्यातील भाविकही धुळ्यात येत असतात. भाविकांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी मंदिर ट्रस्टकडून घेण्यात आली आहे़ जावळनिमित्त येणाºया भाविकांनी मंदिर परिसरातील भक्त निवासात राहण्यासाठी यापूर्वीच नोंदणी करून ठेवली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत मंदिरातील भक्त निवास फुल्ल झाले आहे. यात्रोत्सवाच्या काळात मंदिरातील भक्त निवासमध्ये राहत असतात. आदिशक्ती एकवीरा देवीच्या मुख्य गाभाºयालगत भव्य आशियाना मंडप उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. य्यात्रोत्सवाच्या निमित्ताने बाहेरील विक्रेत्यांनी मंदिरापासून पुढे पंचवटीपर्यंत दुकान थाटण्यास सुरुवात केली आहे.
आदिशक्ती एकवीरादेवीची उद्या पालखी मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:02 PM