ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.4- महाराष्ट्र विधानमंडळाची पंचायत राज समिती 5 ते 7 जुलै या कालावधीत जिल्ह्याच्या दौ:यावर येत आह़े या तीन दिवसांच्या दौ:यात समितीकडून दोन वर्षाचा आढावा आणि स्थानिक आमदारांशी संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांनी दिली़
धुळे जिल्हा परिषदेस 2008-09 आणि 2011-12 या दोन वर्षाचे लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल आणि 2012-13 या वर्षाचा वार्षिक प्रशासन अहवालाच्या संदर्भात भेट देणार आह़े समितीच्या या भेटीमध्ये कामकाजात उपयुक्त ठरेल, अशी माहिती देण्यासंबंधी धुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी समवेत अनौपचारीक चर्चा करण्यासाठी समितीची बैठक 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गुलमोहोर विश्राम गृह येथे होणार आह़े त्यानंतर सकाळी साडे दहा ते 11 वाजेर्पयत जिल्हा परिषदेच्या पदाधिका:यांसमवेत समिती चर्चा करेल़ जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये सकाळी 11 वाजता 2008-09 आणि 2011-12 या वर्षातील लेखा परिक्षा पुनर्विलोकन अहवालातील जिल्हा परिषदेच्या संबंधित परिच्छेदासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष होणार आह़े साक्ष घेतल्यानंतर 6 जुलै रोजी भेट देण्यात यावयाच्या पंचायत समित्यांचे नियोजन करण्यात येईल़ गुरुवारी 6 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपासून जिल्ह्यातील पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायतींना भेटी, पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी व संबंधित अधिका:यांची प्रश्नावली क्रमांक दोनच्या संदर्भात साक्ष होणार आह़े त्यानंतर शुक्रवार 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजेपासून जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये 2012-13 या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष घेण्यास सुरुवात होणार आह़े