धुळे : पाचवी ते दहावीच्या वर्गात प्रवेश घेताना पालकांना घरासमोर एक झाड लावण्यासाठी शिक्षण विभागाने सक्ती करावी अशी मागणीचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकाºया राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे देण्यात आले़ यंदाच्या शेक्षणिक वर्षापासुन इयत्ता पहिलीपासुन प्रवेश घेण्याºया विद्यार्थ्यांचा पालकांना प्रवेश घेतेवेळी मुलाच्या नावाने घराबाजूला किंवा परिसरात एक झाड लावण्याची सक्ती करावी़ तसेच दरवर्षी झाडाबद्दलचा अहवाल सादर करून इयत्ता दहावीत त्या विद्यार्थ्याला बोनस म्हणून १० ते १५ गुण देण्यात यावे. असा उपक्रम राबविल्यास राज्यभरात झाडे मोठ्या प्रमाणावर जगविता येवू शकतात़ शासनाने निर्णय घ्यावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष गौरव बोरसे, राज कोळी, ऋषी चव्हाण, कुणाल पाटील, बंटी निकम, धनंजय चांगरे, लोकेश रणदिवे, पियुष पवार, आकाश बागुल, निखिल शिरसाठ, विश्वजीत पाटील, आयुष जयस्वाल उपस्थित होते.
बोनस गुण द्याइयत्ता पाचवीत एक झाड लावणाया विद्यार्थ्यांने दहावीपर्यत ते झाड जगविल्यास त्या विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत १० ते १५ गुण देण्यात मागणी केली आहे़