शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा-विखरण रस्त्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:10 AM

धर्मा पाटील यांच्या निधनानंतर ग्रामस्थ संतप्त : शासनाच्या विरोधात घोषणााबजी

ठळक मुद्देकाबाडकष्ट करून शेती करणारे धर्मा पाटील यांच्या पश्चात पत्नी सकूबाई पाटील, मुलगा नरेंद्र व महेंद्र पाटील, सून सुनीता व मनीषा पाटील, तसेच मुली रंजना विजयराव सोनवणे (हातेड), रेखा सतीश निकम (देवगाव) व प्रतिभा प्रदीप पवार (गंगापुरी, ता. अमळनेर) असा परिवार आहे. प्रस्तावित सौर प्रकल्पासाठी त्यांच्या जमिनीला केवळ ४ लाख ३ हजार रुपयांचा मोबदला मिळाला होता. परंतु, त्यांच्या शेत जमिनीला लागून असलेल्या शेतमालकास १ कोटी ८९ लाख रुपये मिळाले होते. त्यामुळे त्यांच्यावर झालेला अन्यायाविरोधात त्यांचा प्रशासन व शासकीय पातळीवधर्मा पाटील यांच्या निधनामुळे विखरण गावात शोककळा पसरली आहे.

आॅनलाइन न्यूज नेटवर्क 

शिंदखेडा (जि. धुळे)  :   शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या निधनानंतर सोमवारी सकाळी संतप्त ग्रामस्थांनी दोंडाईचा-विखरण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करीत पाटील कुटुंबीयांना न्याय मिळावा; या मागणीसाठी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच शासनाच्या विरोधात तीव्र संतापही व्यक्त केला. विखरण येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा मंगा पाटील (८०) यांच्या जमिनीला योग्य मोबदला न मिळाल्याने त्यांनी गेल्या सोमवारी थेट मंत्रालयात विष प्राशन केले. तेव्हापासून त्यांच्या प्रकृती ही चिंताजनक होती. त्यांच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी रात्री १० वाजून ४५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच विखरण ग्रामस्थांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. त्यांच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील हे होते. मात्र, त्यांनी योग्य न्याय मिळत नाही. तोपर्यंत त्यांचे पार्थिव उचलणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यातच त्यांच्या विखरण गावातही धर्मा पाटील यांच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत सोमवारी सकाळी आंदोलन के ले. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.