शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

महापालिकेच्या शाळेतून होणार रूग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 12:00 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर निर्णय। प्रत्येक प्रभागातील नागरिकांना मिळणार वैद्यकीय सुविधांचा लाभ

धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शहरातील रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकाला प्रभागात वैद्यकीय सुविधा मिळावी या उद्देशाने शुक्रवारी १ मे रोजी स्वामी टेऊराम हायस्कूल, साक्रीरोड येथे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या उपचार केंद्राचे उदघाटन करण्यात आले.यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजिज शेख, आयएमाएचे अध्यक्ष डॉ. रवि वानखेडकर उपस्थितीत होते.मनपामार्फत सर्वसामान्य आजारावरील रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत तसेच कोरोना संदर्भातील लक्षणांची प्राथमिक तपासणी केली जावी या उद्देशाने शहरातील विविध भागात असलेल्या मनपा शाळांच्या जागेत २० ठिकाणी ओपीडी सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी शहरातील निमा, युनानी मेडीकल असोसिएशन व महाराष्ट्र होमिओपॅथी असोसिएशन या संस्थेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यासाठी सहकार्य देणेबाबत सकारात्मक प्रतिसाद दिलेला होता. त्याअनुषंगाने शुक्रवारी प्रायोगिक तत्वावर प्रथम टप्यात स्वामी टेऊराम हायस्कुल, साक्रीरोड येथे ओपीडी सुरु करण्यात आली. स्वामी टेऊराम हायस्कुललगत संमिश्र समाजाची नागरीकांची वस्ती मोठया प्रमाणावर आहे. तसेच समोरील भागात गरीब व अल्पशिक्षीत कष्टकरी नागरीकांची वस्तीही मोठया प्रमाणावर आहे. प्रायोगिक तत्वावर शुक्रवारपासून ओपीडी सुरु करण्यात आलेली आहे.याप्रसंगी आयएमएमच्या डॉ़दया दिघे, डॉ़ तुषार भट, डॉ़ महेश अहिरराव, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ़ विजय पाटील, सचिव डॉ़ हेमंत भदाणे, डॉ़ संजय सदाणे, डॉ़ व्ही़ जी़ सदाणे, महापालिका उपायुक्त गणेश गिरी, आरोग्य अधिकारी डॉ़ महेश मोरे, महापालिका प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी, साक्रीरोडवरील स्वामी टेउराम हायस्कूलचे अनिल लुल्ला, जगदीश देवपूरकर, अनिल कटारीया, रमेश गुंडायाल आदी उपस्थित होते़१८ अहवालांची प्रतीक्षा, आतापर्यंत ८२७ अहवाल निगेटिव्हयेथील भाऊसाहेब हिरे रुग्णालयातील १८ रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ८२७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ३० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. धुळे शहरातील २२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. साक्री शहरात चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कोरोनाने हातपाय पसरले आहेत. शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात प्रत्येकी दोन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.टप्या-टप्यात ओपीडी सुरूशहरातील अन्य प्रभागातील नागरिकांना वैद्यकीय सुविधेसाठी गैरसोय होऊ नये, यासाठी मनपा शाळेत ओपीडी सुरू केल्या जाणार आहे़ त्यामुळे नागरिकांना प्रभागात वैद्यकीय सुविधा मिळणार आहे़रूग्णालयावरील भार कमी होईलकोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी डॉक्टरांकडून वैद्यकीय सेवा नाकारल्या जात आहे़ तसेच भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रूग्णालयात अन्य उपचारसाठी येणाºया रूग्णांचा भार कमी व्हावा, याहेतूने महापालिकेने प्रत्येक प्रभागात ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे़ दरम्यान सुरूवातील दाट व अल्पसंख्याक प्रभागात विचार केला आहे़कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपा आरोग्य विभागाकडून शहरात अत्यावश्यक ठिकाणी फवारणी तसेच घरोघरी जावून नागरिकांनी आरोग्य तपासणी केली जात आहे़ यात कोरोनाचे लक्षण आढळून येणाºया नागरिकांची माहिती हिरे वैद्यकीय रूग्णालयात पाठविण्यात येत आहे़नाशिक येथे उपचार घेणाºया बाधिताच्या परिवारातील २० ते २५ जणांची रविवारी तपासणीधुळे - नाशिक येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या धुळे शहरातील गल्ली नं.६ मध्ये आढळून आल्याने दुपारी महापालिका आरोग्य विभागाकडून परिसरात फवारणी करण्यात आली़ दरम्यान कोरोना बाधित व्यक्तीचा परिसर यापूर्वीच सील करण्यात आल्याने पुन्हा याभागात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे़ दरम्यान बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या परिवारातील २० ते २५ जणांची रविवारी धुळ्यातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे़दरम्यान बाधित व्यक्तीच्या संपर्कात आतापर्यत किती जण आले आहेत़ याची माहिती महापालिका आरोग्य विभागाकडून काढली जात आहे

टॅग्स :Dhuleधुळे