शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

देशभक्तीपर गीते, स्पर्धांसह विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 12:33 PM

प्रजासत्ताक दिन उत्साहात : जिल्हाभरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वजवंदन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाभरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण उत्साहात पार पडले. शाळा, महाविद्यालयात देशभक्तीपर गीते, विविध स्पर्धा, बक्षिस वितरणासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.आर.सी. पटेल शाळाशिरपूर- शहरातील हिरानगर, गुरुदत्त कॉलनी, सुभाष कॉलनी व वाल्मीकनगर येथील येथील आर.सी. पटेल शाळेत नगरसेविका आशा बागूल यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन जैन, संध्या जैन, मुख्याध्यापक आर.टी. भोई, महेंद्रसिंग परदेशी, क्रांती जाधव आदी उपस्थित होते. गुरुदत्त कॉलनी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नाटिका सादर केली. सुत्रसंचालन ए.बी. पाटील तर आभार प्रदर्शन भारती मराठे यांनी केले.रंधे इंग्लिश मिडीयम स्कूलशिरपूर- येथील डॉ.विजयराव रंधे इंग्लिश मिडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज आॅफ सायन्स येथे शाळेच्या संचालिका हर्षाली रंधे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण दर्शनाचे कार्यक्रम सादर केले. उपशिक्षका कल्याणी चौधरी यांनी देशभक्ती गीत सादर केले़ यावेळी समन्वयक प्रा.जी.व्ही. पाटील, प्राचार्य कामिनी पाटील, सारिका ततार, प्रमोद पाटील उपस्थित होते. सुत्रसंचालन शगुफ्ता मन्सुरी यांनी केले.अंतुर्लीकर विद्यालयशिरपूर- येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे सुपाबाई शिवराम अंतुर्लीकर प्राथमिक विद्यालय व शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे चेअरमन प्रा.पी.एस. अंतुर्लीकर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सामुहिक देशभक्ती गीत सादर केले. स्काऊट गाईडचे ध्वजारोहण रोहित काशीराम पावरा याच्याहस्ते करण्यात आले. स्काऊट गाईड प्रार्थना, झंडा गीत यांचे सामूहिक गायन करण्यात आले. सुत्रसंचालन आर.पी. जाधव यांनी केले.सरस्वती माध्यमिक विद्यालयशिरपूर- येथील श्री हनुमान व्यायाम मंदीर ट्रस्ट संचलित सरस्वती शिशु प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात डॉ.गणेश पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेची माजी विद्यार्थिनी प्रा.पुनम चव्हाण यांच्याहस्ते भारतमाता प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीप लोहार, ज.ता. ईशी, जे.एस. चौधरी, पी.डी. पाटील, प्रकाशसिंग सिसोदीया, शकुंतला देशमुख, संस्थेचे विश्वस्त संजय अग्रवाल, प्रभाकर शिंपी, शोभा सोनवणे, शैलजा वैद्य, महेश लोहार, अनिल अग्रवाल, अधिकार माळी, किशोर ठाकरे, दिलीप चौधरी, सुनिल बारी, शशिकांत चौधरी आदी उपस्थित होते़ भावी पिढीसमोर आदर्श ठेवणाऱ्या निवृत्त गुरुजनांचा सत्कार संस्थेमार्फत करण्यात आला़ सुत्रसंचालन व्ही.जे. बागुल यांनी केले.स्मिता पाटील पब्लिक स्कूलदहिवद- येथील स्मिता पाटील पब्लिक स्कूलमध्ये भारतीय सैन्य दलाचे सेवानिवृत्त अधिकारी बिशम्बंर दयाल यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ़अनिता पाटील, ट्रस्टी, अशोक अग्रवाल, प्राचार्या कल्पना सिंह, पत्रकार कुमकुम शड्डा, प्रशासकीय अधिकारी निलेश कुस्मुदे आदी उपस्थित होते़ शाळेतील मुलांनी लेझीम व मल्लखांबचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले़एस.आर.बी. इंटरनॅशनल स्कूलदहिवद- येथील एस.आर.बी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. यावेळी सेवानिवृत्त प्रकल्प अधिकारी दिलीप चैत्राम येशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसन्न कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष तुकाराम बाविस्कर, उपाध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर, चेअरमन डॉ़धीरज बाविस्कर, मानसी बाविस्कर, सी.ई.ओ. सविता तिवारी, प्रशासकीय अधिकारी श्रीराम कुºहेकर आदी उपस्थित होते़ सिंगापूर आॅलिम्पियाड व जनरल नॉलेजमध्ये यश प्राप्त करणाºया १६२ विद्यार्थ्यांचा पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला़ सुत्रसंचालन करुणा नारखेडे यांनी केले़सावळदे माध्यमिक विद्यालयशिरपूर- सावळदे येथील आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालयात सरपंच मनिषा सोनवणे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच, सभासद, मुख्याध्यापक के.आर. जोशी, डॉ़पायल दंदे, शिक्षक व गावातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुत्रसंचालन बी.बी. अग्रवाल यांनी केले.झेंडेअंजन विद्यालयशिरपूर- झेंडेअंजन येथील आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालयात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चैत्राम गायकवाड यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच देवराम पावरा, दिलीप गवळी, दिलीप गांगुर्डे, मोतीलाल देशमुख, सतीलाल पावरा, मुख्याध्यापक एस.ए. कुरेशी उपस्थित होते. सुरूवातीला गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. पर्यावरण वाचवा आणि तंबाखू मुक्तीकरीता उपस्थित सर्वांनी सामूहिक शपथ घेतली. सुत्रसंचालन एस.एन. पाटील, एन.एस. म्हस्के व पी.पी. परदेशी यांनी केले तर आभार प्रदर्शन डी.आर. राजपूत यांनी केले.रावेर विद्यालयाची प्रभातफेरीदत्तवायपूर- धुळे तालुक्यातील रावेर येथील कै.भा.सु. देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातून देशभक्तीपर घोषवाक्य देऊन विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष निंबाजी सुपडू देवरे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. तसेच मनोगत व्यक्त केले. शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्राचार्य सी.एन. शेवाळे, एस.वाय. पाटील, बी.आर. देवरे, के.एम. देवरे, दिनेश देवरे, वाय.पी. सुर्यवंशी, व्ही.एन. पाटील, एच.एस. शिरसाठ, सी.ए. पाटील, व्ही.आर. पाटील, वाय.एस. नेरकर, एम.आर. महाले, पी.एम. वाघ, जी.एस. सोनवणे, बी.आर. खैरणार, प्रशांत देवरे, आर.एन. जाधव आदी उपस्थित होते.नगाव विद्यालयात गुणगौरवधुळे- नगाव येथील आण्णासाहेब द.वा. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.नगाव एज्युकेशन सोसायटी चेअरमन तथा जि.प. सदस्य राम भदाणे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. अध्यक्ष मनोहर भदाणे होते. यावेळी सरपंच ज्ञानज्योती भदाणे यांच्याहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य के.आर. जाधव यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांसह विविध कलागुणदर्शन कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपमुख्याध्यापक आर.आर. पाटील, उपशिक्षक आर.व्ही बागुल, पी.डी. पाटील यांनी केले.गव्हाणे विद्यालयशिंदखेडा- तालुक्यातील गव्हाणे येथील सावित्रीबाई फुले एज्युकेशन सोसायटी, दुसाणे संचलित डॉ.नानासाो. बन्सीलाल वामनराव बाविस्कर माध्यमिक विद्यालयात सरपंच चेतन बोरसे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी दत्ताणेच्या सरपंच पुष्पाबाई देविदास बोरसे, ग्रा.पं. सदस्या संगीता दीपक बोरसे यांच्या ग्रा.पं. सदस्य, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.चिंचवार विद्यालयाची प्रभातफेरीधुळे- तालुक्यातील चिंचवार येथील माध्यमिक विद्यालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सोमनाथ पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खैरनार, पोलीस पाटील भाऊसाहेब माळी, ग्रा.पं. सदस्य हिलाल पाटील, भगवान मोरे, माजी पोलीस पाटील निंबा पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले. रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. त्यानंतर बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचलन कैलास पाटील यांनी केले. आभार तुकाराम पाटील यांनी मानले.कुडाशी जि.प. शाळापिंपळनेर- कुडाशी येथील जि.प. शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार मंजुळा गावीत यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी आमदार डी.एस. अहिरे, तुळशीराम गावीत उपस्थित होते. आमदार गावीत यांनी विद्यार्थ्यांसमोर शैक्षणिक अनुभव कथन केले. यावेळी मुख्याध्यापक नितीन माणसिंग जाधव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.थाळनेर जि.प. शाळाथाळनेर- शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील जिल्हा परिषद शाळेत थाळनेर गटाच्या नवनिर्वाचित जि.प. सदस्या भैरवी प्रेमचंद शिरसाठ यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :Dhuleधुळे