धुळे : शहरासह जिल्ह्यात सातत्याने वाढणारे गुन्हे आणि त्यांचा वेळीच होणारा निपटारा याकडे संबंधित पोलीस अधिकाºयांनी लक्ष द्यावे़ गांभिर्याने काम करावे, अशा प्रकारच्या सुचना नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छोरींग दोर्जे यांनी आढावा बैठकीतून दिल्या़नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छोरींग दोर्जे हे जळगाव येथे गेले होते़ याठिकाणी पोलीस अधिकाºयांची आढावा बैठक घेऊन ते नाशिकला जाण्यापुर्वी अचानक धुळ्यात थांबले़ छोरींग दोर्जे येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाºयांना कळताच धावपळ उडाली़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्यामार्फत तातडीने शहरासह जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाºयांना बैठकीत उपस्थितीबाबत कळविण्यात आले़ त्यानुसार, पोलीस अधीक्षक कार्यालयातील चिंतन हॉलमध्ये शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विशेष पोलीस महानिरीक्षक छोरींग दोर्जे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली़ यावेळी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भूजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यांची उपस्थिती होती़ बैठकीत, दोर्जे यांनी घडणाºया घटनांचा धावता पण सविस्तर आढावा घेतला़ गुन्ह्यांची उकल लवकरात लवकर करण्यासाठी प्रभारी अधिकाºयांनी गांभिर्याने लक्ष द्या़ गुन्हे वाढू न देता दाखल झालेल्या गुन्ह्यांचा निपटारा करावा अशा प्रकारच्या सूचना दोर्जे यांनी केल्या़ तसेच अनुषंगिक मार्गदर्शनही त्यांनी केले़
गुन्ह्यांच्या उकलकडे गांभिर्याने लक्ष द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 6:38 PM