धुळे : सुलवाडे-जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेत संपादीत झालेल्या शेतजमींनींचा मोबदला त्वरीत मिळावा, अशी मागणी सोंडले ता. शिंदखेडा येथील शेतकऱ्यांनी केली आहे. या शेतकºयांनी बुधवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेसाठी सोंडले शिवारातील शेतकºयांच्या जमीनी संपादीत झाल्या आहेत. परंतु अजुनपर्यंत निवाडा मंजूर झाला नसून मोबदला देखील मिळालेला नाही. शिरपूर प्रांत कार्यालयात दोन ते तीन महिने उशिरा निवाडा झाला. त्यानंतर सदरचा निवाडा जिल्हाधिकारी कार्यालयात महिनाभरापासून तपासणीसाठी प्रलंबित आहे.सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. शेतजमीनी संपादीत झाल्याने पिक कर्ज देखील मिळत नाही. त्यामुळे शेतीची मशागत आणि पेरणी करण्यासाठी पैसी कुठून आणावे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. शिवाय येथील शेतकरी भूमीहीन झाले आहेत. शेतकºयांचा उदरनिर्वाह केवळ शेतीवर अवलंबून असल्याने मोबदला मिळाला तर अन्यत्र शेती खरेदी करता येईल. त्यामुळे संपादीत जमीनींचा मोबदला त्वरीत मिळावा, अशी मागणी भाईदास कृष्णा माळी, संजय नंदलाल परदेशी, मोहन ईश्वरसिंग परदेशी, अशोक गोविंदा माळी, केदारेश्वर मोरे, पराग सुधाकर देशमुख, प्रमोद शंकर डेरे, सुरेश तुकाराम पाटील, भटू धनगर, दंगल धनगर यांच्यासह शेतकºयांनी केली आहे.
संपादीत जमिनींचा मोबदला त्वरीत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 9:41 PM