धुळे : शिवजयंतीनिमित्त ङोंडा लावल्याच्या कारणावरून साक्री रोडवरील राजीव गांधीनगरात गुरुकुल हायस्कूलजवळील चौकात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली़ या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आह़े याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून शहर पोलिसात 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आह़े घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात असून परिसरात तणावपूर्ण शांतता आह़ेयाबाबत विष्णू आनंदा वाडिले (वय 57) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शिवजयंतीनिमित्त ङोंडा लावला होता़ याचे वाईट वाटून जय उर्फ दादा वाल्मीक मोरे, सोनू अहिरे, कुणाल गणेश इंगळे, अमोल गणेश इंगळे, मानव विजय पारेराव, विक्की लहू शेजवळ, राजेंद्र शंकर थोरात, ङिांगा उर्फ अप्पा साळवे व इतर सर्व रा़ भीमनगर, धुळे यांनी हातात लोखंडी पाईप, हॉकी स्टिक व काठय़ा घेऊन विष्णू वाडिले व अनिल उखा श्रीखंडे या दोघांवर हल्ला चढविला, त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली़ दादा मोरे याने लोखंडी पाईपने विष्णू वाडिले यांच्या डोक्यात वार करून त्यांना जखमी केल़े, तर कुणाल इंगळे याने लोखंडी पाईपने अनिल श्रीखंडे यांच्या पायावर वार करून त्यांना जखमी केल़े तर सोनू अहिरे याने हॉकी स्टिकने मारहाण केली़ तसेच इतरांनी दोघांना काठय़ांनी व हाताबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली़ मारहाण करून पळ काढताना त्यांनी गल्लीत उभ्या असलेल्या रिक्षाच्या काचा फोडून नुकसान केल़े याप्रकरणी वरील आठ व इतरांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तर विरोधात मानव विजय पारेराव (वय 17) रा़ भीमनगर याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विष्णू आनंदा वाडिले, हर्षल विष्णू वाडिले, महेश विष्णू वाडिले, अनिल उखा श्रीखंडे, वैभव अनिल श्रीखंडे व इतर दोन ते तीन जण, सर्व रा़ राजीव गांधीनगर यांनी हातात लोखंडी पाईप व काठय़ा घेऊन मानव पारेरावसह कुणाल गणेश इंगळे यांना शिवीगाळ, दमदाटी करून त्यांच्यावर हल्ला केला़ विष्णू वाडिले याने लोखंडी पाईपने डोक्यावर वार केला, मात्र तो चुकवल्याने मानव पारेराव याच्या डोळ्याच्या बाजूला दुखापत झाली़ तर इतरांनी दोघांना मानव पारेरावसह कुणाल इंगळे याला जमिनीवर पाडून हाताबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी सात जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही़ओ़वसावे करीत आहेत़
साक्री रोड परिसरात तणावपूर्ण शांतता!
By admin | Published: February 20, 2017 12:51 AM